मुंबई: बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन आज संध्याकाळी लीलावती रुग्णालयाबाहेर दिसले. यावेळी ते लीलावती रुग्णालयात जात असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांची मुलगी श्वेता नंदा देखील सोबत होती. रुग्णालयात कोणत्या कारणासाठी गेले याचं कारण अजूनतरी समोर आलेलं नाही. मात्र या व्हायरल फोटोंमुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे.
हे फोटो व्हायरल झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांचं अधिकृत म्हणणं अजून समोर आलं नाही. ते कोणत्या कारणासाठी रुग्णालयात गेले हे देखील अजून समजलेलं नाही. मात्र लीलावती रुग्णालयात जाताना त्यांचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. यावेळी त्यांची मुलगी श्वेता नंदाही सोबत असल्याचं दिसत आहे.
विरल भयानीने आपल्या इन्स्टाग्रामवर याचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये चाहत्यांची चिंता वाढली आहे. तर अमिताभ कदाचित रुटीन चेकअप किंवा लस घेण्यासाठी गेले असावेत असा अंदाज लावला जात आहे.
तर दुसरीकडे अभिषेक बच्चनच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्यासाठी देखील रुग्णालयात गेले असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर अनेक चाहते सगळं काही सुरळीत असूदे अशी प्रार्थना करताना कमेंटमध्ये दिसत आहेत.