Amitabh Bachchan : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आज 71 वा वाढदिवस आहे. अमिताभ हे बिग बी या नावानं ओळखले जातात. ते नेहमीच त्यांच्या कृतीतून प्रेक्षकांना प्रेरणादायी ठरतात. त्याशिवाय त्यांच्या शायरी देखील तितक्याच चर्चेत राहतात. आज ते फक्त अभिनेता नाही तर त्यासोबत निर्माता, संगीतकार आणि सुत्रसंचालक आहेत. त्यांनी आजवर अनेक सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. इतकंच नाही तर ते इतकं सगळं करत असूनही यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत. अशात आपण त्यांच्या अशा एका चित्रपटाविषयी जाणून घेणार आहोत. ज्यात हिरोच्या मित्राची भूमिका साकारून त्यांनी लोकप्रियता मिळवली होती.
1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या शोले या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांनी धर्मेंद्र यांच्या मित्राची भूमिका साकारली होती. त्यांच्या या चित्रपटानं रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. तर त्यांच्या या चित्रपटाचा रेकॉर्ड 20 वर्ष कोणी मोडू शकलं नव्हतं. खरंतर कोणाला वाटलं नव्हतं की जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित तेव्हा बॉक्स ऑफिसवर इतकी कमाई करेल. सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर कमाई ही फार कमी होती. पण जेव्हा चित्रपटाची लोकप्रियता वाढली तेव्हा त्यानं अनेक रेकॉर्ड मोडले. चित्रपटानं या दरम्यान, 35 कोटींची कमाई केली.
शोले या चित्रपटात धर्मेंद्र, हेमा मालिनी, जया बच्चन, संजीव कुमार, जगदीप, असरानी, सचिन, एके हंगल, हेलेन आणि अमजग खान सारखे दिग्गज कलाकार दिसले. रमेश सिप्पी यांनी दिग्दर्शिक केलेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर असा रेकॉर्ड केला जो रेकॉर्ड 20 वर्ष कोणी मोडू शकलं नव्हतं. तीन कोटींचा बजेट असणाऱ्या या चित्रपटानं त्यावेळी 35 कोटींची कमाई केली होती. याच चित्रपटात अमिताभ यांनी धर्मेंद्र यांच्या मित्राची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांना खरी लोकप्रियता मिळाली होती.
हेही वाचा : दुर्गा पुजेच्या मंडपात खाता खाता पंगतीत वाढणाऱ्या काजोलचा हा Video पाहून भक्त संतापले
एकदा रमेश सिप्पी आणि हेमा मालिनी अमिताभ बच्चन यांच्या कौन बनेगा करोडपतिमध्ये आले होते. त्यावेळी या दरम्यान, रमेश सिप्पी यांनी बिग बी यांना चित्रपटासाठी का साइन केलं यामागचं खरं कारण काय याविषयी खुलासा केला होता. बिग बीनं जेव्हा जय-वीरूच्या भूमिकेसाठी स्वत:ला कास्ट करण्याविषयी प्रश्न विचारला होता, तेव्हा सलीम-जावेदनं मला विचारलं की अमित जींना ट्राय करून बघा. जंजीरमध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलं होतं. बॉम्बे टू गोवामध्ये त्यांनी डान्स केला आहे. त्याच आधारावर शोलेमध्ये अमिताभ यांना या चित्रपटात कास्ट करण्यात आलं होतं.