Amitabh Bachchan : बॉलीवुडचे नाते हे अफणागिस्तानशी नेहमीच खास राहिले आहे. अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी (capital) काबुल (Kabul) तालिबान्यांच्या (Taliban) ताब्यात गेल्यानंतर शेकडो लोकांना आपला देश सोडून बाहेर पडावे लागत आहे. मात्र अजूनही अफगाणिस्तानात बॉलिवूड (Bollywood) चित्रपट (films), खासकरून बिग बी (Big B) अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) अतिशय लोकप्रिय (famous) आहेत. अमिताभ बच्चन यांच्या खुदा गवाह (Khuda Gawah) या चित्रपटाचे चित्रीकरणही (shooting) अफगाणिस्तानातच करण्यात आले होते. मात्र या चित्रपटानंतर अमिताभ यांच्याबरोबर असं काय घडले? की त्यांच्यासाठी अफगाणिस्तानमध्ये निम्मे वायुदल त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते.
वाचा: बायोपिक 'दादा'चा, उत्सुकता धोनीच्या भूमिकेची; पाहा कोणता अभिनेता गाजवणार चित्रपट
बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांचे चाहते केवळ भारतातच नाही तर जगभरात आहेत. 1992 मध्ये रिलीज झालेल्या खुदा गवाह (Khuda Gawah) या चित्रपटाचे (Cinema) शूटिंग अफगाणिस्तानमध्ये झाले होते. यावेळी आलेले अनुभव 2013 मध्ये फेसबुक पोस्टच्या माध्यमातून बिग बी अर्थात जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी मांडले होते. खुदा गवाह (Khuda Gawah) या चित्रपटात बच्चन यांच्यासोबत श्रीदेवी होत्या. बच्चन यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, 'सोव्हिएत संघाने नजीबुल्लाह अहमदजई यांच्याकडे सत्ता सोपवली होती जे हिंदी चित्रपटांचे चाहते होते. ते आम्हाला भेटले आणि त्यांनी आमचा शाही सत्कार केला. आम्ही हॉटेलमध्ये राहिलो नाही, तर लोकांनी आमच्यासाठी त्यांची घरे सोडली आणि ते लहान घरांमध्ये राहण्यासाठी गेले.’
'खुदा गवाह' या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी अफगाणी बादशाह खानच्या भूमिकेत दिसले होते. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान देशाच्या तत्कालीन राष्ट्रपतींनी देशाचे अर्धे वायुदल बिग बींच्या सुरक्षेसाठी तैनात केले होते. खुदा गवाह हा अफगाणिस्तानात सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट होता. अमिताभ बच्चन यांच्या आई तेजी बच्चन यांना चित्रीकरणादरम्यान बच्चन यांची आणि श्रीदेवीची काळजी वाटत होती. त्या निर्मात्यांवर यावरून चिडल्याही होत्या. त्यांचे म्हणणे होते की त्यांना काहीतरी होऊ शकते.