'ब्लू व्हेल' खेळाचे वाढते लोण पाहून अमिताभ बच्चन चिंतित !

 काही दिवसांपूर्वी एका 14 वर्षीय मनप्रीत सिंग या मुलाने 'ब्लू व्हेल' या खेळाचा एक भाग म्हणून आत्महत्या केल्याचा संशय आहे. 'ब्लू व्हेल' या खेळाचे लोण आता भारतातही येऊ लागल्याने अभिताभ बच्चन यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांनी एक खास संदेशही दिला आहे.' जीवन हे जगण्यासाठी आहे, ते वेळेच्या आधीच संपवू नका'.  

Updated: Aug 4, 2017, 10:52 AM IST
'ब्लू व्हेल' खेळाचे वाढते लोण पाहून अमिताभ बच्चन चिंतित !  title=

मुंबई : काही दिवसांपूर्वी एका 14 वर्षीय मनप्रीत सिंग या मुलाने 'ब्लू व्हेल' या खेळाचा एक भाग म्हणून आत्महत्या केल्याचा संशय आहे. 'ब्लू व्हेल' या खेळाचे लोण आता भारतातही येऊ लागल्याने अभिताभ बच्चन यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. ट्विटरच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांनी एक खास संदेशही दिला आहे.' जीवन हे जगण्यासाठी आहे, ते वेळेच्या आधीच संपवू नका'.  

 

 

"मी बिल्डींगवरून उडी मारून आत्महत्या करत आहे." असा मेसेज नववी इयत्तेमध्ये शिकणार्‍या मुलाने आत्महत्येपूर्वी मित्राला पाठवला होता. मनप्रीत 50 दिवसांपासून ब्लू व्हेल खेळत असल्याचा दावा त्याच्या मित्राने केला आहे.  

 

ब्लू व्हेल' खेळ का  आहे धोकादायक ?

 

किशोरवयीन मुलांसाठी बनवलेला हा खेळ 50 विविध चॅलेन्जेसचा आहे. सुरवातीला सोप्पे आणि  त्यानंतर गंभीर स्वरूपाचे चॅलेन्जेस दिले जातात. यामध्ये हॉरर मुव्ही पाहणं, हातावर ब्लू व्हेल चा आकार  कोरणं अशा चॅलेन्जेसचा समावेश आहे. तसेच टास्क पूर्ण झाल्यानंतर खेळणार्‍या व्यक्तीला त्याचा पुरावा अ‍ॅडमीनला दाखवावा लागतो. त्यानंतरच त्याला पुढील टप्पा पार करता येतो.

 

व्लू व्हेल या खेळाचं अंतिम चॅलेन्ज ' आत्महत्या' आहे. रशियामध्ये बनवण्यात आलेल्या या खेळाच्या विळख्यात अडकून सुमारे 130 मुलांनी आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. त्यामुळे या खेळाचे वेड भारतात पसरू नये यासाठी प्रयत्न केले जात आहे.