मुंबई : बॉलीवुड ,टॉलीवूड ,मराठी सिनेसृष्टी सर्वभाषिक प्रेक्षकांच्या मनावर गेली अनेक दशकं एकहाती गारुड गाजवणारा भारदस्त आवाज अप्रतिम अभिनेता सर्वगुणसंपन्न बिग बी अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन म्हटलं की एक भारदस्त आवाज समोर येतो.
करियरच्या सुरवातीला याच भारदस्त आवाजामुळे रिजेक्शन (REJECTION) झेलावे लागणारे अमिताभ बच्चन आज आवाजामुळेच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत.अशाच दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांचा आज 80व वाढदिवस (amitabh bachchan birthday today)
दमदार चित्रपट (Amitabh bachchan movies), तडफदार भूमिका, धीरगंभीर आवाज आणि रुबाबदार रुप अशी अनेक विशेषण म्हणजे केवळ अमिताभ बच्चन. वयाच्या ऐन्शीत पोहचलेले बिग अविरतपणे प्रेक्षकांनाच मनोरंजन करत आहेत
बिग बी यांनी 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सात हिंदुस्तानी' सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं (amitabh bachchan birthday). पण त्यांना यश मिळालं 'जंजीर' सिनेमातून. त्यानंतर बिग बींनी आजपर्यंत मागे वळून पाहिलं नाही. जसा काळ बदलत गेला, त्याप्रमाणे बिग बींच्या
भुमिका देखील बदलत केल्या. आपल्या भुमिकेतून त्यांनी कधी चाहत्यांना निराश केलं नाही. (amitabh bachchan Bollywood entry) बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आज त्यांचा 80 वा वाढदिवस साजरा करत आहेत आणि या खास प्रसंगी त्यांचे काही किस्से समोर आले आहेत. ( amitabh bachchan birthday Real surname of Amitabh Bachchan knows the secret life of amitabh )
पण तुम्हाला माहित आहे का बिग बी, अमिताभजी यांचं आडनाव बच्चन नाही. ऐकून तुम्हाला हि धक्का बसला ना. हो हे खरं आहे . अमिताभ जी यांचं खर आडनाव बच्चन नाही तर श्रीवास्तव आहे. मात्र ते त्यांच्या वडिलांचं म्हणजेच हरिवंशराय बच्चन यांचं उपनाव जे बच्चन आहे हे आडनाव प्रमाणे लावत असे आणि पुढे जाऊन याच नावाने ते प्रसिद्ध झाले.