या फोटोमुळे अमिशा पटेल पुन्हा झाली ट्रोल

बॉलीवूड अभिनेत्री अमिशा पटेल सध्या चित्रपटसृष्टीतून लांब फेकली गेली आहे.

Updated: Feb 4, 2018, 06:42 PM IST
या फोटोमुळे अमिशा पटेल पुन्हा झाली ट्रोल title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री अमिशा पटेल सध्या चित्रपटसृष्टीतून लांब फेकली गेली आहे. पण सोशल नेटवर्किंगवर मात्र तिच्याबद्दल जोरदार चर्चा सुरु असते. अशाच एका फोटोमुळे अमिशा पटेल पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केल्यामुळे यूजर्सनी तिच्यावर निशाणा साधला.

इन्स्टाग्रामवर ट्रोल व्हायची अमिशा पटेलची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही काही फोटो शेअर केल्यामुळे तिच्यावर टीका झाली होती. यावेळी पारदर्शक कपडे घातल्यामुळे अमिशा पटेलची खिल्ली उडवण्यात आली. तसंच असे फोटो शेअर न करण्याचा सल्लाही काहींनी अमिशाला दिला. 

कहो ना प्यार है या चित्रपटातून अमिशा पटेलनं बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवलं. ऋतिक रोशन आणि अमिशा पटेलचा हा पहिलाच चित्रपट सुपर-डुपर हिट झाला. या चित्रपटानंतर मात्र अमिशा पटेलच्या वाट्याला फारसं यश आलं नाही.

या फोटोमुळे अमिशा पटेलवर निशाणा 

 

Have a lovely Sunday everyone

A post shared by Ameesha Patel (@ameeshapatel9) on