हा छोटा सरदार बॉलिवूडवर करतोय राज्य; ओळख पाहून विश्वासच बसणार नाही

किती गोड आहे हा छोटा सरदार.... अशीच प्रतिक्रिया अनेकजण देत आहेत. 

Updated: Apr 13, 2022, 04:36 PM IST
हा छोटा सरदार बॉलिवूडवर करतोय राज्य; ओळख पाहून विश्वासच बसणार नाही  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक फोटो कमालीचा व्हायरल होताना दिसत आहे. हा फोटो पाहताना बाळाचं निरासग रुप पाहून नकळतच चेहऱ्यावर हास्य येत आहे. किती गोड आहे हा छोटा सरदार.... अशीच प्रतिक्रिया अनेकजण देत आहेत. (Bollywood )

काही वर्षांपूर्वीचा हा फोटो आता व्हायरल होण्यामागे तसं कारणही आहे. हा छोटा सरदार आता बराच मोठा झाला आहे. 

वर्षाला 100 कोटींहून अधिकची कमाई करणाऱ्या या छोट्या सरदाराची ओळख आणि नातं एका अतिशय प्रतिष्ठीत कुटुंबाशी जोडलं गेलं आहे. हे कुटुंब आहे, भट्ट परिवार. 

हा छोटा सरदार म्हणजे नेमका कोण, असा प्रश्न जर तुम्हाला आताही पडत असेल तर आम्ही सांगू इच्छितो की हा सरदार मुलगा नसून एक मुलगी आहे. 

ही मुलगी आज विविध भूमिका साकारत आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत आली आहे. तिचं नाव आहे, आलिया भट्ट. (Alia bhatt )

विश्वास बसत नाहीये ना? आलिया लहान असतानाचा तिचा हा अतिशय निरागस फोटो सध्या सर्वांच्या मनाचा ठाव घेत आहे. बालकलाकार म्हणून तिनं या कलाजगतात प्रवेश केला होता. 

Alia Bhatt Talks About How People Are 'Constantly Eating', Shares Some Easy  Tips - Zee5 News

1999 मध्ये आलियानं अक्षय कुमार आणि प्रिती झिंटा यांच्या चित्रपटातून ती बालकलाकार म्हणून झळकली होती. हीच आलिया आता इतकी मोठी झालीये, की अवघ्या काही क्षणांतच ती कपूर कुटुंबाची सून आणि अभिनेता रणबीर कपूर याची पत्नी होणार आहे. (Alia bhatt ranbir kapoor )