अमेय आणि निपुण दिसणार हिंदी सिनेमांत

 मराठीतील लोकप्रिय जोडी अमेय आणि निपुण आता लवकरच बॉलिवूडमध्ये झळकणार आहेत. ज्याप्रमाणे बॉलिवूडमंडळी मराठी सिनेमांत पाहुणा कलाकार म्हणून दिसतात अगदी त्याप्रमाणे मराठी कलाकार बॉलिवूडमध्ये देखील दिसणार आहे. आता ही मराठीतील चर्चेतील जोडी हिंदी सिनेमांत दिसणार आहे.  या सिनेमाचं नाव आहे 'हाय जॅक' . 'आम्ही पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटासाठी एकत्र काम करतोय' असं अमेयनं याबाबत एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं आहे. 

Dakshata Thasale Updated: Mar 29, 2018, 04:01 PM IST
अमेय आणि निपुण दिसणार हिंदी सिनेमांत  title=

मुंबई : मराठीतील लोकप्रिय जोडी अमेय आणि निपुण आता लवकरच बॉलिवूडमध्ये झळकणार आहेत. ज्याप्रमाणे बॉलिवूडमंडळी मराठी सिनेमांत पाहुणा कलाकार म्हणून दिसतात अगदी त्याप्रमाणे मराठी कलाकार बॉलिवूडमध्ये देखील दिसणार आहे. आता ही मराठीतील चर्चेतील जोडी हिंदी सिनेमांत दिसणार आहे.  या सिनेमाचं नाव आहे 'हाय जॅक' . 'आम्ही पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटासाठी एकत्र काम करतोय' असं अमेयनं याबाबत एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं आहे. 

या सिनेमांत असणार Guest Appearance 

तो पुढे म्हणाला की, 'या चित्रपटाचे दिग्दर्शक आकर्ष खुराना यांनी माझ्याकडे आणि निपुणकडे या चित्रपटासाठी विचारणा केली होती. दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिला चित्रपट असल्याने मित्राच्या पहिल्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटामध्ये असणाऱ्या सगळ्याच कलाकारांनी यापूर्वीही नाटक, वेबसीरिज यामध्ये एकत्र काम केलंय. त्यामुळे सगळी मंडळी आपलीच आहेत असं वाटत होतं. काम करताना खूप मजा आली. मला हिंदी चित्रपटामधून ऑफर आली आहे म्हणून मी तो केला असं नाही. यापूर्वीही मी हिंदीमध्ये काम केलंय आणि यापुढे हिंदीतून एखाद्या चांगल्या भूमिकेबद्दल विचारणा झाली तर नक्कीच करेन. पण त्याबरोबर चांगले मराठी चित्रपटही मला करायचे आहेत., असं अमेय म्हणाला. 

अमेय आणि निपुणचा अगदी जवळचा मित्र आणि दिग्दर्शक सारंग साठ्ये देखील आपल्याला या सिनेमांत दिसणार आहे. सारंग साठ्येने या सिनेमासाठी तब्बल 12 वर्षांनी आपला लूक बदलला आहे. सारंग साठ्येने या सिनेमासाठी दाढी काढली आहे. त्यामुळे हाय जॅक हा सिनेमा या मराठी कलाकारांमुळे सुरूवातीपासूनच चर्चेत आहे हे नक्की.