मुंबई : 'कहो ना प्यार हैं' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात राज्य करणारी अभिनेत्री अमीषा पटेलचा आज वाढदिवस आहे. 'कहो ना प्यार हैं' चित्रपटानंतर अमीषाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिच्या दुसऱ्या चित्रपटाला देखील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. त्या चित्रपटाचं नाव होत 'गदर'. दोन चित्रपटांनंतर अमीषाचा प्रवास थांबला. नंतर तिला कायम सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिका मिळायला लागल्या. चित्रपटांपेक्षा जास्त तिचं नाव वादांमध्ये राहिलं.
अमीषाचे तिच्या कुटुंबासोबत देखील वाद झाले. तिने स्वतःच्या वडिलांवर गंभीर आरोप केले. अमीषाने तिच्या वडिलांवर 12 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. माझे वडील माझ्या पैशांचा गैरवापर करतात; असा आरोप तिने केला. त्यासाठी अमीषाने वडिलांना कायदेशीर नोटीस देखील पाठवली होती.
पण काही वर्षांनंतर त्यांच्या कुटुंबातील वाद संपले. 2009साली अमीषा पटेल आणि भाऊ अश्मित पटेल दोघांना सिनेमागृहात स्पॉट करण्यात आलं होतं. त्यानंतर अमीषाच्या आईने देखील रंगलेल्या वादाला दुजोरा दिला होता. अमीषा अभिनयात सक्रिय नसली तरी ती सोशल मीडियावर मात्र कायम ऍक्टिव्ह असते.
अमीषाच्या चित्रपटांबद्दल सांगायचं झालं तर, 2002 साली प्रदर्शित झालेल्या 'हमराज' चित्रपटानंतर अमीषाच्या करियरला ब्रेक लागला. रूपरे पडद्या तिचे अनेक चित्रपट फेल ठरले. यानंतर अमीषाने काही तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्येही काम केले पण त्यातही तिला यश मिळालं नाही. आता अमीषा चित्रपटांमध्ये अमिषा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकली.