अभिनेत्रीने या व्यक्तीसोबत मिळून बनवला होता अभिनेत्या पतीला अडकवण्याचा प्लॅन; लिक मेलमुळे खुलासा

हॉलिवूड सुपरस्टार जॉनी डेप आणि त्याची एक्स पत्नी एम्बर हर्ड हे त्यांच्या प्रकरणामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत.

Updated: Jun 27, 2022, 10:10 PM IST
अभिनेत्रीने या व्यक्तीसोबत मिळून बनवला होता अभिनेत्या पतीला अडकवण्याचा प्लॅन;  लिक मेलमुळे खुलासा title=

मुंबई : हॉलिवूड सुपरस्टार जॉनी डेप आणि त्याची एक्स पत्नी एम्बर हर्ड हे त्यांच्या प्रकरणामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. एम्बरने जॉन डेपवर काही गंभीर आरोप केले होते, त्यानंतर अभिनेत्याने त्याच्या एक्स पत्नीविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर जॉनी डेपने एम्बरविरुद्धचा खटला जिंकला. कोर्टाने एम्बरला सुमारे10 मिलियन डॉलर नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

दोघांचं हे प्रकरण संपलं असलं तरी स्टार्सशी संबंधित सगळ्या प्रकारच्या बातम्या अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता या  दरम्यान, जॉनी डीप आणि एम्बर हर्डच्या प्रकरणाशी संबंधित एक मेल समोर आला आहे, जो जॉनी डीपच्या कायदेशीर टीम Adam Waldman, Ben Chew, and Camille Vasquez यांच्याशी संबंधित आहे.  हा मेल अॅडम आणि जॉनी डीपच्या मित्रामध्ये जोश ड्रू संभाषणाचा आहे जेव्हा एम्बर हर्डने 2016 मध्ये घरगुती हिंसाचाराचा आरोप करत पोलिसांना घरी बोलावलं होतं.

या मेलमध्ये जोश ड्रू म्हणजेच जॉनी डीपच्या मित्राची एक्स पत्नी रॅकेल  आणि एम्बर हर्डच्या एलोन मस्कसोबतच्या विवाहबाह्य संबंधांचाही उल्लेख आहे. जॅक नावाच्या एका चित्रपट निर्मात्याने तिच्या ट्विटर अकाऊंटवर या मेलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. 

या प्रकरणामुळे जॉनी डेपला त्याच्या व्यावसायिक आयुष्यात खूप त्रास सहन करावा लागला. अनेक चित्रपट त्याच्या हातातून निसटले होते. तर त्याला चित्रपटांच्या ऑफर्सही मिळणं बंद झालं होतं. पण आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॉनी डेप लवकरच त्याच्या सुपरहिट फिल्म सीरिज पायरेट्स ऑफ द कॅरेबियनचा भाग बनणार आहे.

जॉन डेपच्या चित्रपट कारकिर्दीला पायरेट्स ऑफ द कॅरिबियन या प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपटाद्वारे नवी उड्डाणे मिळाली. आता डिस्नेने केवळ डेपची माफी मागितली नाही. तर जॉनी डेपला डिस्नेकडून 'पायरेट्स ऑफ द कॅरिबियन 6'मधील जॅक स्पॅरोच्या भूमिकेसाठी 2,355 कोटींची ऑफर देण्यात आली आहे.