मुंबई : 'पुष्पा द राइज' (Pushpa The Rise)या चित्रपटातून अभिनेत्री रश्मिका मंदाना ही प्रेक्षकांच्या भेटीला आली. दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन याच्यासोबत तिनं या चित्रपटातून स्क्रीन शेअर केली. (Allu Arjun, Rashmika Mandanna)
चित्रपटातील रश्मिकानं साकारलेल्या श्रीवाली, या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला.
फक्त दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतच नव्हे, तर संपूर्ण भारतात आणि जगभरातील असंख्य ठिकाणीही या चित्रपटाचाच डंका सध्या पाहायला मिळत आहे.
दक्षिणेकडील चित्रपट जगतातील नामांकित अभिनेत्रींच्या यादीत रश्मिकाच्याही नावाचा समावेश केला जात आहे.
अभिनेत्री लोकप्रियतेच्या शिखरावर आहे म्हटलं की तिच्या संपत्तीचा आकडाही तितकाच मोठा असणार. नाही का?
असं म्हणतात की, रश्मिका 4 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 30 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे.
सध्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्येही तिच्या नावाचा उल्लेख होते. रश्मिका एका चित्रपटासाठी 3-4 कोटी रुपये इतकं मानधन आकारते.
2016 मध्ये पदार्पण
रश्मिकानं 2016 मध्ये 'किरिक पार्टी' या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. चित्रपटात तिनं रक्षित शेट्टी याच्याशी स्क्रीन शेअर केली होती.
सूत्रांच्या माहितीनुसार बंगळुरुमध्ये रश्मिकाचा स्वत:चा आलिशान व्हिला आहे. ज्याची किंमत 8 कोटी रुपये इतकी आहे.
तिला महागड्या कारचाही छंद आहे. तिनं स्वत:लाच 50 लाख किमतीची मर्सिडीज बेंझ C क्लास भेट दिली होती.
याशिवाय तिच्याकडे टोयोटा, इनोवा आणि Hyundai Creta अशाही कार आहेत. ज्यांची किंमत 3 कोटींच्या घरात आहे.
काही दिवसांपूर्वीच तिनं गोव्यातही एक घर खरेदी केलं. त्यापूर्वी हैदराबादमधील गाचीबावली भागातही तिनं नवं घर खरेदी केलं होतं.
फक्त चित्रपट नव्हे, तर सोशल मीडिया, विविध जाहिराती आणि कार्यक्रमांच्या माध्यमातूनही रश्मिका दणदणीत कमाई करते.
इतक्या कमी वयात इतकी दमदार कमाई करणाऱ्या या अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबाबत कायमच कुतूहल व्यक्त केलं जातं.
तेव्हा आता तिचा जोडीदार कोण होणार याकडेच चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.