Pushpa सिनेमातील हे गाणं आता मराठीत पण?

अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना या दोघांचीच सध्या सगळीकडे चर्चा आहे.

Updated: Jan 12, 2022, 05:45 PM IST
  Pushpa सिनेमातील हे गाणं आता मराठीत पण? title=

मुंबई : अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना या दोघांचीच सध्या सगळीकडे चर्चा आहे. त्याचं कारण म्हणजे त्यांचा नुकताच झालेला पुष्षा हा सिनेमा.

दोघांनी या सिनेमात जबरदस्त काम केलं आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे. त्यात हा सिनेमा गाण्यांमुळे रिलीज आधीच चर्चेत आला.

सगळ्यात आधी तुफान गाजलं ते सामी सामी (Saami Saami)हे गाणं. या गाण्यानंतर समांथाच्या (Samantha) आयटम सॉन्गनेही धुमाकूळ घातला. पण आता सगळीकडे या दोन्ही गाण्यांपेक्षा स्रीवल्ली या गाण्याची जादू पाहायला मिळते आहे. अनेकजण या गाण्याच्या प्रेमात पडले आहे. उशिरानं का होईना, सिनेमाच्या रिलीजनंतर हे गाणं आता सगळ्यांना भुरळ पाडतंय. 

मुळच्या तेलुगूमध्ये तयार करण्यात आलेल्या पुष्पा सिनेमाची गाणी ही मल्याळम, तमिळ आणि हिंदी या भाषेत आहेत. पण आता समोर आलेलं स्रीवल्ली (Srivalli Song) हे गाणं मराठीतही साकारण्यात आलं आहे.

स्रीवल्लीचं मराठी वर्जन विजय खंदारे यांनं आपल्या युट्युब चॅनेलवर शेअर केलं आहे. हे गाणं विजय यानं फक्त मराठीत रचलं नाहीये, तर या गाण्याचा खास व्हिडीओ ही तयार केला आहे.

एक छान लव्हस्टोरी, मराठी स्रीवल्ली या गाण्यात दिसून आली आहे. जणू काही मराठीतच हे गाणं साकारलं गेलं पहिल्यांदा, असा भास स्रीवल्लीचं ओरीजनल न ऐकलेल्याला होऊ शकतो.

विजय खंदारेनं 3 मिनिटं 44 सेकंदाचा हा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यानं तयार केलं आहे.