रणबीरसोबत लग्नानंतर आलियाने उचललं हे मोठं पाऊल, लवकरच करणार मोठी घोषणा

बॉलीवूडचं क्यूट कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे चाहत्यांना खूप आवडतं.

Updated: Aug 20, 2022, 08:34 PM IST
रणबीरसोबत लग्नानंतर आलियाने उचललं हे मोठं पाऊल, लवकरच करणार मोठी घोषणा  title=

मुंबई : बॉलीवूडचं क्यूट कपल आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे चाहत्यांना खूप आवडतं. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केलं जातं. लवकरच आलिया भट्ट आई होणार आहे. ज्याची माहिती तिने सोशल मीडियावर पोस्ट करून दिली होती. त्याचबरोबर आता अभिनेत्री एक मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

खरंतर, आलिया भट्टबद्दल माहिती आहे की, ती तिचं नाव बदलणार आहे. रिपोर्ट्समध्ये असं म्हटलं जात आहे की, 'ती लवकरच तिचे नाव देखील बदलणार आहे. असं बोललं जात आहे की आलिया तिच्या नावासमोर भट्ट-कपूर किंवा कपूर-भट्ट जोडणार आहे आणि सोशल मीडियासह तिच्या सगळ्या अधिकृत कागदपत्रांमध्ये हे नाव बदललं जाईल. त्याचबरोबर, आता चाहते त्याच्या अधिकृत वक्तव्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

आलिया भट्टने तिच्या एका मुलाखतीत सांगितलं आहे की, 'तिच्या पासपोर्टमधील नाव आणि वैवाहिक स्थिती बदलण्यासाठी तिला अद्याप वेळ मिळालेला नाही. मात्र, रणबीर कपूरने आनंदाने तिची वैवाहिक स्थिती बदलली आहे. आलियाने सिनेसृष्टीत एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत. त्याचबरोबर, आज मोठ्या दिग्दर्शकांना तिच्या चित्रपटात आलियाला कास्ट करायचं आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी या वर्षी लग्न केलं. ज्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. या दोघांच्या लग्नात त्यांचे नातेवाईक तसंच जवळच्या मित्रांनीच हजेरी लावली होती. त्याचबरोबर अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात दोघंही पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. हे दोघे पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत. ज्याची चाहत्यांनी खूप दिवसांपासून प्रतीक्षा केली होती. त्याचबरोबर ती 'जी ले जरा' या चित्रपटातही दिसणार आहे.