आलिया किंचाळत राहिली, पण कतरिना थांबली नाही... काय सुरुये या दोघींचं? 

आलिया भट्ट सध्या लंडनमध्ये तिच्या आगामी हॉलिवूड चित्रपटाचं शूटिंग करत आहे. 

Updated: Jul 4, 2022, 12:57 PM IST
आलिया किंचाळत राहिली, पण कतरिना थांबली नाही... काय सुरुये या दोघींचं?  title=

मुंबई : आलिया भट्ट सध्या लंडनमध्ये तिच्या आगामी हॉलिवूड चित्रपटाचं शूटिंग करत आहे. आलिया भट्टने नुकतीच तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली की, ती लवकरच आई होणार आहे. मात्र याच दरम्यान आलिया भट्टचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत कतरिना कैफही दिसत आहे. जी आलियावर खूप जबरदस्ती करत असल्याचं दिसत आहे.

कतरिनाने कडकपणा दाखवला
रणबीर कपूरची एक्स गर्लफ्रेंड असूनही, आलिया भट्ट कतरिना कैफ एकमेकींच्या खूप जवळच्या मैत्रिणी आहेत. दोघींना अनेक वेळा एकत्र पाहिलं गेलं आहे. पण याच दरम्यान या दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये कतरिना आलियावर जबरदस्ती करताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये आलिया आणि कतरिना जिममध्ये दिसत आहेत आणि आलिया वजन उचलताना आणि सिटअप करताना दिसत आहे. तर कतरिना मागून आलियाचे सिटअप मोजत आहे आणि तिला अजून  करायला सांगत आहे.  तर आलिया भट्ट वेदनेने ओरडत आहे. पण कतरिना मात्र थांबण्याचं नाव घेत नाही आणि आलियाला थांबूही देत नाही.

आलियाचे सुंदर फोटो
आलिया भट्टने नुकतेच तिचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ताज्या फोटोंमध्ये, आलिया भट्टने गुलाबी रंगाचा अतिशय घट्ट वन-पीस परिधान केला आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री इतकी ग्लॅमरस दिसत आहे की, तिला पाहून कोणीही वेडं होईल. आलियाने जो ड्रेस घातला आहे. ज्याला समोरच्या साइटवरून मोठा कट आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हा कट आलियाचा ड्रेस आणखी ग्लॅमरस बनवत आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या वर्षी 14 एप्रिल रोजी विवाहबद्ध झाले. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलियाने तिच्या गर्भधारणेची घोषणा केली. तेव्हापासून ती तिच्या प्रेग्नेंसीबद्दल सतत चर्चेत आहे.