मुंबई : अनेकांच्या मनावर राज्य करणारी आणि मराठी कलाविश्वात फार कमी वेळातच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचणारी ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. आपल्या अदांनी अनेकांनाच घायाळ करणाऱ्या सईने सध्या तिच्या एका फोटोमुळे अनेकांच लक्ष वेधलं आहे. सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या, नेहमीचच चाहत्यांना फॅशन गोल्स देणाऱ्या सईने चक्क तिच्या तथाकथित प्रियकरासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. यावेळी बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत फोटो पोस्ट केला आहे.
बॉयफ्रेंडसोबत फोटो शेअर करत सईने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून कॅप्शनमध्ये 'तुझे सगळे स्वप्न पूर्ण होवूदे....' अशी प्रर्थना केली आहे. सईच्या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
एका चाहत्याने कमेंटमध्ये 'यंदा कर्तव्य आहे म्हणजे...' असं लिहिलं आहे. सई आणि बॉयफ्रेंडच्या च्या फोटोंवर रसिका सुनील, मुक्ता बर्वे, अमृता खानविलकर, क्षितिज पटवर्धन, स्वप्निल जोशी या कलाकारांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.
कोण आहे सईचा बॉयफ्रेंड?
सईच्या बॉयफ्रेंडचं नाव अनिश जोग आहे. तो चित्रपट निर्माता आहे. 'टाईमप्लीज', 'व्हायझेड', 'मुरांबा', 'गर्लफ्रेंड', 'धुरळा' या सिनेमांची निर्मिती अनिशने केली.
Sai Tamhankar च्या बॉयफ्रेंडची सर्वत्र चर्चा, दोघांच्या 'या' फोटोंवर बसणार नाही विश्वास