ए हालोssss! कपूर कुटुंबाची होणारी सून, गुजराती गाण्यावर थिरकताच सगळे गार

सूनेच्या भन्नाट डान्सवर काय म्हणाल्या सासूबाई...  

Updated: Feb 11, 2022, 12:16 PM IST
ए हालोssss! कपूर कुटुंबाची होणारी सून, गुजराती गाण्यावर थिरकताच सगळे गार  title=

मुंबई : दिग्दर्शक संजल लिला भंसाळी दिग्दर्शित 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाची सध्या जोरदार चर्चा रंगत आहे. सिनेमात अभिनेत्री आलिया भट्ट गंगूबाईची भूमिका साकारताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. सिनेमाचा ट्रेलर प्रत्येकाला आवडला असेल असं म्हणायला हरकत नाही, कारण सिनेमात आलिया सेक्स वर्करच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आली. 

'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाच्या ट्रेलरनंतर एक गाणं प्रदर्शित करण्यात आलं. 'ढोलीडा' गाण्यावर आलियाने धरलेला गुजराती ठेका फक्त प्रेक्षकांना नाही तर आलियाच्या सासूबाईंना देखील फार आवडला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gangubai  (@aliaabhatt)

आलियाचा डान्स पाहिल्यानंतर  अभिनेता आणि तिचा बॉयफ्रेंड रणबीर कपूरची आई नितू कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फक्त रणबीरच्या आईनेचं नाही तर त्याची बहिण रिद्धिमा देखील आलियाचं कौतुक केलं. 

आलियाच्या डान्सवर कमेंट करत नितू कपूर यांनी टाळ्यांचा इमोजी पोस्ट केला, तर दुसरीकडे रिद्धिमा देखील आलियाचं कौतुक केलं. सध्या  आलियाचं नवं गाणं आणि त्यावर तिने धरलेला ठेका सर्वांचं मनोरंजन करत आहे.