Alia Bhatt : 'यामुळे माझ्या कामावर परिणाम...', लग्न आणि मुलीच्या जन्मानंतर अखेर 'ती' जरा जास्तच स्पष्ट बोलली

Alia Bhatt नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. या मुलाखतीत आलिया करिअरच्या पिकवर असताना आयुष्यातील मोठ्या निर्णयांवर स्पष्टच बोलली आहे. 

Updated: Jan 2, 2023, 12:24 PM IST
 Alia Bhatt : 'यामुळे माझ्या कामावर परिणाम...', लग्न आणि मुलीच्या जन्मानंतर अखेर 'ती' जरा जास्तच स्पष्ट बोलली title=

Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. आलियानं नुकतंच पती रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) नवीन वर्षाचे स्वागत केले. दरम्यान, आलियानं करिअरच्या पिकवर असताना रणबीरशी लग्न केले. आलियानं 2022 मध्ये एकापाठी एक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आणि याच वर्षी तिनं रणबीरशी लग्न केले. लग्नाच्या काही महिन्यातच आलियानं लेक राहा (Raha Kapoor) जन्म दिला. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करिअरच्या पिकवर असताना एका वर्षात इतकं काही झाल्यानंतर आलियानं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

आलिया भट्टनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे की, करिअरच्या पिकवर असताना लग्न करण्याच्या निर्णयाबद्दल तिला कोणताही पश्चाताप नाही. आलियानं ही मुलाकत 'ई-टाइम्स'ला दिली होती. यावेळी आलियानं सांगितले की, तिला कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप नाही आणि ती तिच्या प्रत्येक निर्णयावर खूश आहे. आलिया पुढे म्हणाली, 'होय, मी माझ्या करिअरच्या पिकवर असताना लग्न केले आहे आणि मूल होण्याचा निर्णयही घेतला, पण यामुळे माझ्या कामावर परिणाम होईल असं कोण बोलत. माझ्या कामावर परिणाम झाला तरी मला त्याची पर्वा नाही. (Alia Bhatt Speak In An Interview)  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आलिया लग्न करण्यावर आणि फॅमिलि प्लनिंगवर निर्णय घेण्यावर म्हणाली, 'मला माहितीये की फॅमिलि पॅलिंग करण्याच्या निर्णयावर पश्चाताप नसेल. ही एक नैसर्गिक गोष्ट आणि आता पर्यंतचा हा माझा सगळ्यात योग्य असलेला निर्णय आहे.' (Alia On Having Raha) 

हेही वाचा : वयाच्या 15 व्या वर्षी Ruhaanika Dhawan स्वत:च्या घराची मालकीण; पाहिलं का तिचं मुंबईतील Dream Home?

आज आलिया तिच्या करिअरच्या त्या टप्प्यावर आहे, जिथे पोहोचणं जवळपास प्रत्येक अभिनेत्रीचं स्वप्न असतं. लहान वयातच तिला स्टारडम मिळालं आणि तिनं ते टिकवूनही ठेवलं. नुकताच तिचा 'ब्रह्मास्त्र' (Brahamastra) हा चित्रपट प्रदर्शित झाला, या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. या चित्रपटात आलियासोबत तिचा पती रणबीर कपूरची देखील मुख्य भूमिका आहे. या दोघांच्या व्यतिरिक्त या चित्रपटात या चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), नागार्जुन (Nagarjuna), मौनी रॉय (Mouni Roy) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय आलियानं गेल्या वर्षी म्हणजेच 2022 साली हॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सध्या आलियानं कामातून ब्रेक घेतला असून तिच्या मुलीसोबत वेळ व्यथित करत आहे. याशिवाय  रणबीर लवकरच रामायणावर आधारीत एक चित्रपट करणार असल्याचे म्हटले जातं आहे.