Alia Bhatt वर संकट... ट्रॉली घेऊन विमानतळावर का मारली धाव?

विमानतळावर ट्रॉली घेऊन का धाऊ लागली आलिया भट्ट, नक्की काय आहे प्रकरण? व्हिडीओ व्हायरल  

Updated: May 3, 2022, 02:27 PM IST
Alia Bhatt वर संकट...  ट्रॉली घेऊन विमानतळावर का मारली धाव? title=

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरने 14 एप्रिल रोजी लग्न केलं. लग्नानंतर त्यांच्या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. लग्नानंतर काही दिवसांतचं  दोघांनी कामाला देखील सुरूवात केली आहे. दरम्यान, आलियाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये आलिया कसलाचं विचार न करता सुसाट धावताना दिसत आहे. तिच्या आजू-बाजूला देखील लोकांची गर्दी जमेलली दिसत आहे. 

सध्या आलियाचा व्हायरल होणारा व्हिडीओ दिल्ली येथील इंदिरा गांधी इंटरनॅशनल विमानतळावरील आहे. आलियाच्या फॅनपेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल होणारा व्हिडीओ शूटिंग दरम्यानचा आहे. 

सांगायचं झालं तर, आलिया लवकरचं दिग्दर्शक करण जोहर दिग्दर्शित 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाची शूटींग जोरात सुरू आहे. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आलियासोबत सिनेमाची टीम देखील दिसत आहे. तर दुसरीकडे आलिया अभिनेता आणि पती रणबीर कपूरसोबत 'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.