Alia Bhatt Reaction on Brahmastra Poster Use By Mumbai Police: ब्रह्मास्त्र चित्रपटाची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रपटातील स्टारकास्टपासून ते कलेक्शनपर्यंत रोज रोज कोणती ना कोणती बातमी समोर येत असते. आयन मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र (Brahmastra) या चित्रपटात शाहरुख खानकडे वानरास्त्र, नागार्जुनकडे नंदीअस्त्र आहे आणि मौनी जुनून पात्र साकारत आहे. असं असताना आता पोलिसांनी रस्ते वाहतूक आणि सुरक्षेसाठी 'ब्रह्मात्र' चित्रपटातील काही संदर्भ घेत फोटो पोस्ट केले आहेत. त्याचबरोबर एक पोस्ट लिहिली आहे. मुंबई पोलीस (Mumbai Police) सर्वसामान्य जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरत असते.
पोलिसांनी पोस्ट करत लिहिलं आहे की, "जरी तुमच्याकडे वानरास्त्र असलं तरी सिग्नल तोडू नका. जरी नंदी अस्त्र असलं तरी एक्सलेटरवर जोर देऊ नका. ‘जुनून’ आणि ‘वेग’ तुमच्या विश्वाला धोक्यात आणू शकतात. सुरक्षितपणे वाहन चालवणे हे कायमच सर्वात मोठं अस्त्र आहे." , अशी पोस्ट पोलिसांनी लिहिली आहे.
तो आगीने जळत नाही, पण आपण अपघातात जखमी होऊ शकता!
वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्या आणि सुरक्षित प्रवास करा! pic.twitter.com/bnn00nM5ej
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) September 13, 2022
हे संदर्भ पाहून आलिया भट्टने (Alia Bhatt) आश्चर्य व्यक्त केले आहेत. इतकंच काय तर मुंबई पोलिसांच्या क्रिएटिव्हीटीवर नेटीझन्सही खूश झाले आहेत. आलिया भट्टनं इन्स्टास्टोरीवर फोटो ठेवत 'Epic' अशी कॅप्शन दिली आहे.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर स्टारर 'ब्रह्मास्त्र' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्येच 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला असून जगभरात 225 कोटी रुपयांची कमाई केली. ‘ब्रह्मास्त्र’ 9 सप्टेंबर रोजी हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.