Alia Bhatt Looks Unhealthy: राहाच्या जन्मानंतर आलियाची ही अवस्था?

Alia Bhatt चा हा लूक पाहून तिच्या चाहत्यांना तिची चिंता वाटू लागली आहे. दरम्यान, तिचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Updated: Feb 25, 2023, 01:41 PM IST
Alia Bhatt Looks Unhealthy: राहाच्या जन्मानंतर आलियाची ही अवस्था? title=

Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) ही चित्रपटसृष्टीतील सर्वात चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. आलिया भट्ट तिच्या बिनधास्त वक्तव्यासाठी ओळखली जाते. काही दिवसांपूर्वीच आलियानं लग्न गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आलिया आणि रणबीरनं तिचं नाव 'राहा' ठेवलं आहे. राहाच्या जन्मानंतर आलिया कशा स्वत: ला मेनटेन करते हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते आतुर आहेत. इतकंच काय तर नुकतेच आलियाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी मुलीच्या जन्मानंतर आलिया आजारी असल्याचे म्हटले आहे. (Alia Bhatt Health)

आलियानं संजय लीला भन्साळी यांच्या 60 व्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या पार्टीत हजेरी लावली होती. काल 24 फेब्रुवारी रोजी संजय लीला भन्साळी यांचा वाढदिवस होता. यावेळी आलियाचा तिच्या गाडीतील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोत आलियानं पांढऱ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे. आलियाचा लूक पाहून ती आजारी आहे की काय असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. नेहमीच सुंदर दिसत असणाऱ्या आलियाचा चेहरा पाहून तिचं वजन कमी झाल्याचं नेटकरी बोलत आहेत. तर तिच्या काही चाहत्यांना तिची चिंता वाटते. तर काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की राहाच्या जन्मानंतर आलिया डिप्रेशनमध्ये गेली आहे. इतर काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की लेक राहाची काळजी घेत आलिया दमली आहे. व्हायरल झालेल्या आलियाच्या या फोटोवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांची चिंता व्यक्त केली आहे. 

आलियाच्या घरातील फोटो व्हायरल 

स्वत:च्या घरात एके दिवशी दुपारच्या वेळी निवांत बसलेलं असतानाच आलियाला काहीतरी जाणवलं आणि तिच्या लक्षात आलं की आपल्याकडे कुणीतरी पाहतंय. सतत आपल्यावर कुणाचीतरी नजर आहे, याची कुणकूण लागताच तिनं नजर वळवली आणि आपल्यावर फोटोग्राफर्स नजर ठेवून असल्याचं तिच्या लक्षात आलं. तिचे हे खासगी क्षण सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या या लोकांवर आलिया चिडली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : Divya Agarwal च्या Ex-Boyfriend वरुण सूदच्या बहिणीला एका वर्षानंतर आली जाग; दागिने मागत म्हणाली...

रिपोर्ट्सनुसार, मुंबई पोलिसांनी सदर प्रकरणानंतर आलिया भट्टशी संपर्क साधला आणि तिला यासंदर्भात रितसर तक्रार दाखल करण्यास सांगितलं. जिथं, एका छायाचित्रकारानं तिचे खासगीतील फोटो काढत ते ऑनलाईन पोर्टलवर प्रसिद्धही केले. अभिनेत्रीकडून पोलिसांना सहकार्य करण्यात आलं असून, आपली PR Team त्या पोर्टलच्या संपर्कात असल्याची माहिती देण्यात आली आहे.