आई झाल्यानंतर शुटिंग करताना अशी झाली होती आलियाची अवस्था, म्हणाली, ''मी दमले होते पण...''

Alia Bhatt Experience Post Shooting: आलिया भट्ट आणि रणवीर सिंगचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. यावेळी आलियानं आपल्या या ट्रेलरच्या निमित्तानं आपल्या चाहत्यांशी संवाद साधला होता. यादरम्यान तिनं आपल्या गरोदरपणाचा अनुभव शेअर केला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 4, 2023, 08:02 PM IST
आई झाल्यानंतर शुटिंग करताना अशी झाली होती आलियाची अवस्था, म्हणाली, ''मी दमले होते पण...'' title=
July 4, 2023 | alia bhatt explains her experience of shooting tum kya mile song post pregnancy

Alia Bhatt Experience Post Shooting: आलिया भट्ट आणि रणवीर सिंगचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्यामुळे सर्वत्र त्याचीच चर्चा रंगलेली आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद येताना दिसतो आहे. हा चित्रपट सर्वांचाच बहुप्रतिक्षित चित्रपट होता. त्यामुळे अल्पावधीच या चित्रपटाला लाखो व्ह्यूज आले आहेत. सध्या आपल्या या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्तानं आलिया फार बिझी आहे. त्यामुळे सोशल मीडियावरही आलियानं आपला हा ट्रेलर आल्यानंतरची प्रतिक्रिया उमटवली आहे. तिनं आपल्या या आगामी चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला याबाबत इन्टाग्रामवरून आपल्या चाहत्यांना या चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला याबाबत आपल्या चाहत्यांची संवाद साधला आहे. 

त्यावेळी एका चाहत्यानं तिला तिच्या प्रेग्नंन्सीवर प्रश्न विचारला आहे. ज्यावर आलियानं मनमोकळेपणानं उत्तर दिलं आहे. Ask Me Anything चा सेशन अनेक कलाकार आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून करताना दिसतात. यावेळी आलियानंही हा प्रयोग केला आहे. या चित्रपटातील 'तुम किया मिले' हे गाणं आलियानं तिच्या प्रेग्नंन्सीनंतर म्हणजे राहाला जन्म दिल्यानंतर शूट केलं आहे. त्यावर तिचा Post Pregnancy शुटिंगचा अनुभव नक्की कसा होता यावर तिला एका चाहत्यानं प्रश्न विचारला आहे. त्यावर आलिया म्हणाली की, हा शुटिंगचा शेवटचा दिवस होता. मी फार दमलेली दिसत होते परंतु फार समाधानी होते. आई झाल्यानंतर आपल्या प्रोफेशनमध्ये परत शिरणं हे इतकं सोप्पं नाही. जेव्हा आपल्या शरीरातील बदल न सांगता तुम्ही काम करता तेव्हा तुमच्या मनात अनेक तऱ्हेचे विचार येतात. पण मी खूप आभारी आणि मला फार पाठिंबा मिळाला तो म्हणजे माझ्या सर्व क्रु मेंमर्सकडून. मला इतर नव्यानं आई झालेल्या महिलांबद्दल समजून घेता आलं.

खासकरून त्या महिला ज्यांना मूलाला जन्म दिल्यानंतर लगेचच काम सुरू करावे लागते त्यांचे काय होत असेल याची मला कल्पना आहे. वैभवी मॅडम फार काळजीपुर्वक माजी सर्व नर्सिंग शेड्यूलची काळजी घेत सगळं मॅनेज करत होत्या. माझी आई आणि माझी बहीण माझ्या लेकीला सांभळत होत्या. मी दूर असताना त्याच तिची काळजी घेत होत्या. परंतु ही माझ्या बेबी गर्लची पहिली काश्मिर ट्रीप होती. तिच्या डोळ्यांनी तिनं काश्मिरचे ते सर्व डोंगर पाहिले होते.'' असं यावेळी तिनं मोकळेपणानं सांगितले. 

हेही वाचा - ''मला कोणी नको फक्त...'' इतक्या वर्षांनी विक्रम भट्टसोबतच्या नात्यावर अमिषा पटेलनं केलं भाष्य

alia bhatt explains her experience of shooting tum kya mile song post pregnancy

आलिया सध्या आपलं आईपण एन्जॉय करते आहे. आत्तापर्यंत रणबीर आणि आलियानं आपल्या लेकीचा चेहरा रिव्हिल केलेला नाहीये. त्यामुळे चाहत्यांनाही उत्सुकता लागून राहिली आहे.