Alia-Ranbir Welcome Baby Girl: 'मुलगी झाली हो' !..आलिया रणबीरच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन..

अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरला कन्यारत्न प्राप्त.. मुलीच्या आगमनाने कपूर आणि भट्ट कुटुंबात आंनदाला उधाण आलं आहे.

Updated: Nov 6, 2022, 01:12 PM IST
Alia-Ranbir Welcome Baby Girl:  'मुलगी झाली हो' !..आलिया रणबीरच्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन.. title=

Alia Bhatt pregnancy : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरला कन्यारत्न प्राप्त.. मुलीच्या आगमनाने कपूर आणि भट्ट कुटुंबात आंनदाला उधाण आलं आहे. रविवारी सकाळी 7.30 वाजता आलियाला Reliance रुग्णालयात दाखल करण्यात आल होतं. आलिया रुग्णालयात दाखल केल्यानंतर कुटुंबियांनी देखील रुग्णालयात धाव घेतली. महत्त्वाचं म्हणजे यावेळी आलियासोबत पती आणि अभिनेता रणबीर कपूर (ranbir kapoor) देखील होता. आलिया डिलीव्हरीसाठी (Alia Bhatt delivery) रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आल्यामुळे कुटुंब आणि चाहते आनंदात होते. त्यानंतर नुकताच आलियाने चाहत्यांना 'गुडन्यूज' दिली आहे. आता आलिया आणि रणबीरचे चाहते दोघांना शुभेच्छा देत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आलिया मुलगी झाल्याची बातमी विरळ भयानीने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दिली. पण अद्याप कपूर आणि भट्ट कुटुंबाकडून कोणत्याही प्रकारचा अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे अभिनेत्री नीतू भट्ट, सोनी राजदान सोशल मीडियावर काय पोस्ट करतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.