महिला खासदारचा बोल्ड लूक कॅमेऱ्यात कैद; काही क्षणात Video सोशल मीडियावर Viral

महिला खासदारच्या बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल...  

Updated: Nov 6, 2022, 12:25 PM IST
महिला खासदारचा बोल्ड लूक कॅमेऱ्यात कैद; काही क्षणात Video सोशल मीडियावर Viral  title=

Nusrat Jahan Bold Video: गेल्या काही दिवसांपासून लग्न आणि प्रेग्नन्सीच्या बातम्यांमुळे चर्चेत असणारी बंगाली अभिनेत्री आणि पश्चिम बंगालमधील टीएमसीच्या खासदार नुसरत जहां (Nusrat Jahan) आता सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आल्या आहेत. नुसरत जहां याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमधील नुसरत यांच्या ग्लॅमरस अदांमुळे सोशल मीडियावर त्यांच्या लूकची चर्चा आहे. (nusrat jahan marriage)

बॅकलेस ड्रेसमध्ये दिसणाऱ्या नुसरत यांच्यावरुन कोणाचीच नजर हटत नाही (nusrat jahan social media). खास व्हिडीओ पोस्ट करत नुसरत यांनी कॅप्शनमध्ये, 'शनिवारसाठी तयार होत आहे...तुमचे वीकेंड प्लॅन्स काय आहेत?'असं लिहिलं आहे. पाहा व्हिडीओ 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nussrat Jahan (@nusratchirps)

नुसरत यांचे  वैयक्तिक आयुष्य
सांगायचं झालं तर, नुसरत यांचे  वैयक्तिक आयुष्य नेहमीच वादात राहिले आहे. त्यांचं पहिलं लग्न 2019 मध्ये तुर्कीतील बिझनेसमन निखिल जैनसोबत झालं होतं. पण 2020 मध्ये दोघे वेगळे राहू लागले. दरम्यान, नुसरत गरोदर असल्याची बातमी आली आणि निखिलने सांगितले की, हे मूल त्याचे नाही. 

नुसरत आणि यश दासगुप्ता
यानंतर नुसरतचे नाव यश दासगुप्तासोबत जोडले जाऊ लागले. 2021 मध्ये ऑगस्टमध्ये नुसरत यांनी इशान या मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्म प्रमाणपत्रावर यशचे नाव लिहिले होते. याशिवाय यशच्या वाढदिवशी नुसरत यांनी केकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यामध्ये त्यांनी यशला पती आणि मुलाचा पिता असल्याचे सांगितलं.