Alia Bhatt Blessed With Baby :रणबीर-आलियाची लेक कोणासारखी दिसते? आजी नीतू सिंगने दिलं उत्तर

Alia Bhatt Baby :रणबीर-आलियाची (Ranbir- Alia Bhatt) सोन परी कोणासारखी दिसते असा प्रश्न नीतू सिंग (Neetu Singh) यांना पापाराझींनी विचारला त्यानंतर त्यांनी हे गुपित सांगितलं आहे.   

Updated: Nov 7, 2022, 08:16 AM IST
 Alia Bhatt Blessed With Baby :रणबीर-आलियाची लेक कोणासारखी दिसते? आजी नीतू सिंगने दिलं उत्तर title=
Alia Bhatt Baby looks like alia or ranbir neetu singh revealed nmp

Neetu Singh on Alia Bhatt Baby : बॉलिवूडमधील कपूर आणि भट्ट कुटुंबात एका गोंडस आणि छोट्या परीचं आगमन झालंय. रणबीर-आलिया (Ranbir- Alia Bhatt) यांनी मुलगी झाल्यानंतर आजी नीतू सिंग (Neetu Singh) यांचा आनंद गगनात मावतं नाही आहे. एप्रलिमध्ये रणबीर-आलियाने लग्न केल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर आनंदाची बातमी दिली आणि सगळ्यांच आश्चर्यचा धक्का बसला होता. त्यानंतर सगळे वाट पाहत होते आलियाला काय होणार याची..काल रविवारी 6 नोव्हेंबरला आलिया-रणबीरच्या घरी छोटीशी परी आली. त्यानंतर कूपर-भट्ट कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. आई आलियाने सोशल मीडियावर ही गोड बातमी दिल्यानंतर त्यांचावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. 

आजीचा आनंद गगनात मावे ना! (Newly Grandmother Neetu Singh Happy)

रणबीर कपूर वडील झाला आणि नितू सिंग आजी याचा आनंद नीतू सिंग यांच्या चेहऱ्यावर ओसडून वाहत आहे. सगळ्यांना मुलं झालं की एकच उत्सुकता असते. बाळ कोणासारखं दिसतं...त्यामुळे रणबीर-आलियाची सोन परी कोणासारखी दिसते असा प्रश्न नीतू सिंग यांना पापाराझींनी विचारला त्यानंतर त्यांनी हे गुपित सांगितलं आहे. जेव्हा नीतू सिंग हॉस्पिटलमधून बाहेर आली तेव्हा त्यांना पापाराझींनी घेरलं. त्यानंतर प्रश्नांचा भडीमार सुरु केला.  पापाराझींनी विचारले की, तुम्हाला नीतूजींना काय सांगायचे आहे, लक्ष्मी जी घरात आली आहे, त्यावर नीतू सिंह म्हणाली- 'तुम्ही नेहमी असं का विचारता कसं वाटतं आहे आता? मी खूप आनंदी आहे.' (Alia Bhatt Baby looks like alia or ranbir neetu singh revealed nmp)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Voompla (@voompla)

मुलगी कोणासारखी दिसते ? (Alia Bhatt Baby looks like)

यानंतर पापाराझींनी नीतू सिंगला विचारले की बाळ कोणाकडे गेले आहे. आलियाजीवर की आरकेवर? प्रत्युत्तरात नीतू सिंह म्हणाली- 'बेबी आजच जन्माला आली आहे ती अजून खूप छोटी आहे?' यानंतर जेव्हा पापाराझींनी आलियाच्या तब्येतीबद्दल विचारले तेव्हा नीतू सिंह म्हणाल्या की, 'ती पूर्णपणे ठीक आहे. धन्यवाद.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alia Bhatt (@aliaabhatt)

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आई-वडील होताच सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षावर पडतं आहे. केवळ चाहत्यांनीच नाही तर सेलिब्रिटींनीही रणबीर आणि आलियाला बाळाच्या आगमनाबद्दल सतत शुभेच्छा दिल्या. या सगळ्यामध्ये आलियानेही आई झाल्यानंतर पहिली पोस्ट टाकली. या पोस्टमध्ये आलियाने सांगितले की ते पालक झाले आहेत आणि गोंडस मुलगी आली आहे.