मुंबई : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या दोघांच्या नात्याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. ''ब्रम्हास्त्र'' या सिनेमाच्या माध्यमातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण आलिया आणि रणबीर एकमेकांना डेट करत असलेल्या चर्चांना आता उधाण आलं आहे. त्यात ऋषी कपूर यांनी भट्ट कुटुंबाबाबत केलेलं ट्विट हे या सगळ्या गोष्टींना दुजोरा देत आहे.
असं म्हटलं जातं की, आलिया आणि रणबीर हे एकमेकांना आता डेट करत आहेत. पण खरं सांगायच झालं तर आलिया रणबीरवर अगदी सुरूवातीपासून क्रश होतं. आलियाचा स्टुंडट ऑफ द इअर हा सिनेमा आला तेव्हापासून तिचं रणबीरवर क्रश होतं. आणि याबाबत तिने ''कॉफी विथ करण'' या शोमध्ये याचा खुलासा केला आहे.
करणने रॅपिड फायर राऊंडमध्ये आलियाला एक प्रश्न विचारला आणि तेव्हाच ही गोष्ट समोर आली. करणने आलियाला विचारलं की, जर तुझं स्वयंवर भरवलं तर तू कुणाला निमंत्रित करशील. त्या प्रश्नाचं उत्तर देताना आलियाने क्षणाचाही विलंब न करता सर्वात प्रथम रणबीर कपूरचं नाव घेतलं. यावरून आपल्याला लक्षात येईल की अगदी त्यावेळेपासून तिचं रणबीरवर क्रश होतं.