आलिया आणि रणबीरचा व्हिडिओ व्हायरल

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या चर्चेत

Updated: Jul 9, 2018, 10:02 AM IST
आलिया आणि रणबीरचा व्हिडिओ व्हायरल title=

मुंबई : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या चर्चेत आहेत. काही दिवसापूर्वीच रणबीर आलियाला भेटण्यासाठी तिच्या घरी देखील पोहोचला होता. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्यात काही तरी सुरु आहे अशी देखील बॉलिवूडमध्ये चर्चा आहे. दोघे ही अनेक ठिकाणी एकत्र दिसत आहेत. रणबीर आलिया आणि तिचे वडील महेश भट्ट यांना भेटण्यासाठी तिच्या घरी देखील गेला होता. त्याचे फोटो देखील समोर आले होते पण त्यानंतर दोघांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.

हा व्हिडिओ एका फॅनने शेअर केला आहे. ज्यामध्ये आलियाच्या हातात तिचा फोन आहे आणि नंतर तो फोन ती रणबीरला त्याच्या खिशात ठेवण्यासाठी देते. 

आलिया आणि रणबीरने यांनी काही दिवसांपूर्वी आपलं अफेयर सार्वजनिकपणे स्विकारलं आहे. दोघे एकत्र फिरतांना देखील अनेक दिसले आहेत. एका इंटरव्यूमध्ये रणबीरने म्हटलं होतं की, 'त्याला त्याच्या रिलेशनशिपची सर्कस नाही बनवायची आहे ज्यामुळे लोकं त्याची मज्जा घेतील.'