मुंबई : अली गोनी आणि जास्मिन भसीन यांना टीव्ही जगतातील सगळ्यात पावर कपल म्हणून ओळखलं जातं. मात्र याचदरम्यान अली गोनीने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. प्रत्येकवेळी प्रेमात बुडालेलं हे कपल आपल्या केमिस्ट्रीने लोकांना वेडं लावतं.
अशामध्ये यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या दोघांची ही पोस्ट पाहून त्यांचे फँन्स हैराण झाले आहेत. अली गोनीने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने एक अशी लाईन लिहीली आहे की, जी लोकांना विचार करायला भाग पाडत आहे. अली गोनीने नुकतच एक ट्वीट केलं आहे. आणि लिहीलं आहे की, आम्ही एकत्र नाही आहोत. मात्र आमच मन कायम एकमेकांसोबत जोडलेलं राहीलं.
अली गोनी आणि जास्मिन भसीनचा हा ब्लॅक एंड व्हाइट फोटो बिग बॉसच्या घरातला आहे. अलीच्या ट्वीटने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. चाहते या पोस्टवर कमेंट करत अनेक प्रकारचे प्रश्न विचारत आहेत. त्यांचे चाहते हे जाणून घेवू ईच्छितात. कारण अलीच्या या ट्वीटचे दोन अर्थ निघतात. पहिलं अली आणि जास्मिन कामामुळे एकमेकांपासून दुर आहेत पण तरीही एकमेकांच्या जवळ आहेत. आणि दुसरं या दोघांच ब्रेकअप झालं आहे आणि तरीही हे दोघं कायम एकमेकांचे चांगले मित्र बनून राहतील.
— Aly Goni (@AlyGoni) April 4, 2022
आता या ट्वीटचा काय अर्थ होतो हे तर अली गोनीच जाणे. अलीच्या या ट्वीटवर कमेंटचा वर्षाव होत आहे. हा फोटो जास्मिनने देखील तिच्या इंस्टा स्टोरीवर शेअर केला आहे. आणि आलीला टॅग केलं आहे. दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्या फँन्सचा हार्टब्रेक करत आहे. त्यांचे फॅन्स हे विचार करुन हैराण होत आहेत की, असं नेमकं काय झालं आहे की, या दोघांनी आपले रस्ते वेग-वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहेत. तर काही फँन्स या दोघांसाठी देवाकडे प्रार्थानाही करत आहेत.