अक्षय कुमारच्या Bell Bottom सिनेमातून आतापर्यंत इतक्या कोटींची कमाई

अक्षय कुमारच्या 'बेल बॉटम' ला वीकेंडला थोडी उसळी मिळाली. चित्रपटगृहे 50% क्षमतेने सुरु आहेत. तर अनेक ठिकाणी कोविड -19 साथीच्या निर्बंधांमुळे सिनेमागृह अजूनही बंद आहेत. अशा परिस्थितीत बेल बॉटमने रविवारी सुमारे 4.25-4.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Updated: Aug 23, 2021, 01:53 PM IST
अक्षय कुमारच्या Bell Bottom सिनेमातून आतापर्यंत इतक्या कोटींची कमाई title=

मुंबई : अक्षय कुमारच्या 'बेल बॉटम' ला वीकेंडला थोडी उसळी मिळाली. चित्रपटगृहे 50% क्षमतेने सुरु आहेत. तर अनेक ठिकाणी कोविड -19 साथीच्या निर्बंधांमुळे सिनेमागृह अजूनही बंद आहेत. अशा परिस्थितीत बेल बॉटमने रविवारी सुमारे 4.25-4.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

बॉक्सऑफिसइंडिया डॉट कॉमच्या एका अहवालानुसार, रविवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये थिएटर ऑक्युपन्सी मर्यादा असूनही वाढ दिसून आली. मात्र, हा चित्रपट महाराष्ट्रात अद्याप प्रदर्शित झालेला नाही. अशा परिस्थितीत, बेल बॉटमला कमाईसाठी फक्त 40% बाजार मिळाला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, चित्रपटाचा वीकेंड बिझनेस सुमारे 13 कोटी रुपये अपेक्षित आहे. शनिवारी आणि रविवारी सिनेमा पाहण्यासाठी लोकं सिनेमागृहात आलेले पाहायला मिळाले.

सोमवारी चित्रपटाच्या कमाईचा आकडा कुठे पोहोचतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बेल बॉटमच्या कमाईबद्दल काही स्पष्ट आकडेवारी अद्याप आलेली नाही. एचटीच्या मते, अक्षय कुमारच्या बेलबॉटमने चार दिवसात 12.65 कोटींची कमाई केली आहे, तर त्याचे रविवारचे कलेक्शन सुमारे 4.30 कोटी आहे.

या चित्रपटाने जान्हवी कपूर, राजकुमार राव यांच्या हॉरर-कॉमेडी रुहीलाही मागे टाकले आहे, जो मार्चमध्ये रिलीज झाला होता, ज्याला वर्षाच्या सर्वाधिक ओपनिंग वीकेंड कलेक्शन मिळाले होते. रुहीने 12.58 कोटींची कमाई केली. गुरुवारी तो रिलीज झाला होता.

मुंबई आणि पुण्यासारख्या प्रमुख शहरांमध्ये अजूनही चित्रपटगृहे बंद आहेत, ज्यामुळे चित्रपटाच्या कमाईवर जोरदार परिणाम होण्याची अपेक्षा आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, उत्तर प्रदेश, गुजरातसारख्या मोठ्या प्रदेशांनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. दिल्ली एनसीआरच्या तुलनेत रक्षाबंधनासारख्या प्रसंगी बॉक्स ऑफिसवर सामान्यतः मोठी कमाई करणाऱ्या प्रदेशांमध्ये फारशी वाढ झाली नसल्याचे या अहवालात म्हटले आहे.