प्रयोगशील नाहीत ते वैज्ञानिक कसले? 'मिशन मंगल'चा ट्रेलर प्रदर्शित

प्रयोगशील नाहीत ते वैज्ञानिक कसले?...

Updated: Jul 18, 2019, 02:45 PM IST
प्रयोगशील नाहीत ते वैज्ञानिक कसले? 'मिशन मंगल'चा ट्रेलर प्रदर्शित title=

मुंबई : येत्या १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या मल्टीस्टारर 'मिशन मंगल' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. इतिहासात सुवर्णाक्षरांमध्ये नोंद करण्यात आलेल्या अंतरिक्ष यात्रेचा यशस्वी प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. 

चित्रपटात अक्षय कुमारसह विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, किर्ती कुल्हरी आणि नित्या मेननही भूमिका साकारणार आहे. 'मिशन मंगल' जगन शक्ती यांनी दिग्दर्शित केला आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर ४५ सेकंदाचा टीजरही रिलीज करण्यात आला होता.

अक्षय कुमारने त्याच्या ट्विटरवर चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला आहे. 

या चित्रपटात अक्षय कुमार एका वैज्ञानिकाची भूमिका साकारत आहे. अक्षय चित्रपटात राकेश धवन ही व्यक्तीरेखा साकारत असून तो या मिशनचा प्रमुख आहे.