अक्षय कुमार- ट्विंकलकडून मदतीचा हात, थेट यूकेतून मागवले 100 ऑक्सीजन कंसंट्रेटर्स

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्याकडून मदतीचा हात

Updated: Apr 27, 2021, 07:56 PM IST
अक्षय कुमार- ट्विंकलकडून मदतीचा हात, थेट यूकेतून मागवले 100 ऑक्सीजन कंसंट्रेटर्स title=

मुंबई : देशात सध्या कोरोना विषाणू थैमान घालत आहे. वेगवेगळ्या राज्यात आणि शहरांमधील रुग्णालयांमध्ये बेड, ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा आहे. ऑक्सिजनचा अभाव हे कोरोना रुग्णांसाठी सर्वात मोठे संकट म्हणून पुढे आले आहे, ज्यामुळे लोकांना प्राणही गमवावे लागले. ट्विटरवर लोकं मदतीसाठी आवाहन करत आहेत. गरजूंना मदत करण्यासाठी मॅसेज फिरत आहेत.

बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी देखील अनेकांचे ट्विट रिट्विट करत मदतीचं आवाहन केलं आहे. अनेक जण मदतीसाठी पुढे येत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना यांनी देशात ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता ऑक्सिजन कंसंट्रेटर दान करण्याचे ठरविले आहे, त्यांना वितरणासाठी सक्षम आणि नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांची आवश्यकता आहे. ट्विंकलने ट्विटरद्वारे लोकांची मदत घेतली आहे. ट्विंकलने म्हटलं की, कृपया मला विश्वसनीय आणि नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांविषयी माहिती द्या, जी 100 ऑक्सिजन कंसंट्रेटर वितरीत करण्यास मदत करू शकतील. ट्विंकलने ट्वीटमध्ये म्हटले आहे की हे त्यांच्याकडे थेट यूकेमधून पोहोचवले जातील.

एका युजर्सच्या ट्विटवर उत्तर देताना ट्विंकल म्हणाली की, ती ट्विटरचा उपयोग फक्त काही काळासाठी बुलेटिन बोर्ड म्हणून करत होती, परंतु या युगात तात्पुरती परतली होती. दुसर्‍या ट्विटमध्ये ट्विंकलने म्हटले की, लंडनमध्ये भारतीय वंशाच्या दोन डॉक्टरांनी 120 ऑक्सिजन कंसंट्रेटर दान करण्याचे ठरवले. अक्षय आणि ट्विंकलचे त्यात आणखी 100 मिळवून आता 220 ऑक्सिजन कंसंट्रेटर वितरीत करणार आहेत.

यापूर्वी अक्षय कुमारने गौतम गंभीर फाउंडेशनला कोरोना पीडितांसाठी अन्न, औषधे आणि ऑक्सिजनची व्यवस्था करण्यासाठी एक कोटी रुपयांची मदत केली होती. ट्विटरद्वारे माहिती देताना गौतम गंभीर यांनी अक्षय कुमारचे आभार मानले होते.

ट्विटरवर सेलिब्रिटी कोरोना पीडितांना मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. प्रियंका चोपडा, सोनू सूद, भूमि पेडणेकर, मनोज बाजपेयी, विनीत कुमार सिंग, सोनम कपूर, आलिया भट्ट, स्वरा भास्कर, तप्सी पन्नू, आदिल हसन यांनी आतापर्यंत मदतीचं आवाहन केलं आहे.