अक्षय कुमारने येथे लावली सॅनिटरी नॅपकिन्सची वेडिंग मशिन...

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने मुंबई सेंट्रल एसटी बस डेपोमध्ये सॅनिटरी नॅपकिन्सची वेंडिंग मशीन स्थापित केली आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 16, 2018, 10:40 PM IST
अक्षय कुमारने येथे लावली सॅनिटरी नॅपकिन्सची वेडिंग मशिन... title=

नवी दिल्ली : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने मुंबई सेंट्रल एसटी बस डेपोमध्ये सॅनिटरी नॅपकिन्सची वेंडिंग मशीन स्थापित केली आहे. अशा वेडिंग मशिन्स देशभरात अन्य ठिकाणीही प्रस्थापित करण्यात येणार आहेत. अक्षयचा नुकताच आलेला पॅडमॅन हा चित्रपट मासिक पाळी आणि स्वच्छता यावर भाष्य करतो. त्याच्या अजून एक पाऊल पुढे जात अक्षयने हे पाऊल उचलले आहे. या वेडिंग मशीनच्या उद्घाटनप्रसंगी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्यावेळेसचा फोटो अक्षयने ट्विटरवर शेअर केला आहे.

अक्षय म्हणतो...

फोटो शेअर करताना अक्षयने लिहिले की, आज मुंबई सेंट्रलच्या एसटी डेपोमध्ये एक सॅनिटरी नॅपकिन्सची वेंडिंग मशीन स्थापित करण्यात आली. यानंतर संपूर्ण देशभरात अशी मशिन लागण्याची आशा आहे. समर्थनासाठी आदित्य ठाकरेंचे धन्यवाद. 

आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

यावर आदित्य ठाकरेनेही ट्वीट केले. त्यात तो म्हणाला की, चित्रपट लवकरच १०० कोटींचा आकडा पार करेल. नेहमी चांगले काम करण्याची प्रेरणा दिल्याबद्दल अक्षय कुमार यांचे धन्यवाद.

अशी आहे पॅडमॅनची कथा

लक्ष्मीकांत चौहान (अक्षय कुमार) याचे नवे नवे लग्न झाले आहे. त्याच्या पत्नीच्या गायत्रीच्या भूमिकेत राधिका आपटे आहे. लग्नानंतर त्याला कळत नाही की दर महिन्याला ५ दिवस तिला बाहेर का बसावे लागते? जेव्हा मासिक पाळी हे कारण त्याला समजते तेव्हा त्याविषयावर ते दोघे एकमेकांशी नीटसे बोलू शकत नाहीत. आणि जेव्हा त्याला कळते की पाळीच्या काळात त्याची पत्नी खराब कपड्यांचा वापर करते आणि डॉक्टरांनी सांगितल्यानुसार ते आरोग्यासा हानिकारक असून त्यामुळे अनेक जीवघेणे आजार होऊ शकतात. तेव्हा तो स्वतः सॅनिटरी पॅड्स तयार करण्याचा प्रयत्न करतो. प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर तो त्याच्या पत्नीला आणि गावातील बायकांना सॅनिटरी पॅड्चे महत्त्व पटवून देतो.