अक्षय कुमारचा प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मावर गंभीर आरोप, म्हणाला....

अक्षय कुमार सध्या बच्चन पांडे सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. ट्रेलर आणि गाण्यांना सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. 

Updated: Mar 10, 2022, 02:35 PM IST
अक्षय कुमारचा प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मावर गंभीर आरोप, म्हणाला.... title=

मुंबई : बॉलिवूडचे स्टार अभिनेता अक्षय कुमार द कपिल शर्मा शोमध्ये आपल्या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी आला होता. त्यावेळी बोलताना त्याने कपिल शर्मावर गंभीर आरोप केला आहे. साजिद नाडियाडवालाचा सिनेमा बच्चन पांडे बहुप्रतिक्षित चित्रपट कधी येणार याची वाट सर्वजण पाहात आहेत. 

सिनेमाच्या ट्रेलरने आधी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. कपिल शर्मावर अक्षय कुमारने आरोप केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.

अक्षय कुमारने आपला मित्र कपिल शर्माला विश्वास न ठेवण्यासारखा मित्र म्हटलं आहे. अक्षय कुमार आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आला होता. त्यावेळी अक्षय आणि कपिल शर्माने एक चॅलेंज दिलं आहे. तुमच्या आयुष्यातील विश्वास न ठेवण्यासारखी धोकेबाज व्यक्ती तुम्हाला कोण वाटते ते सांगायचं आहे. 

अक्षय कुमार आणि कपिल शर्मा शोमध्ये मस्करी करत होते हे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यामुळे अक्षयने केलेले आरोपही मस्करीत होते हे यामधून दिसत आहे. या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. 

अक्षय कुमार सध्या बच्चन पांडे सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. ट्रेलर आणि गाण्यांना सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. आता हा सिनेमा कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार याची उत्सुकता सर्वांना आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)