अक्षय कुमार साकारणार खलनायक

अक्षय कुमारचा लवकरच एक सिनेमा येतो आहे. १९९४ साली आलेल्या इंडियन सिनेमाचा हा रिमेक असणार आहे. 

Updated: Jan 17, 2019, 05:29 PM IST
अक्षय कुमार साकारणार खलनायक  title=

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार लवकरच खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. हरहुन्नरी कलाकारांच्या यादीत अक्षयचा समावेश होतो. त्याचा‘केसरी’हा सिनेमाही लवकरच प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारचा लवकरच एक सिनेमा येतो आहे. १९९४ साली आलेल्या इंडियन सिनेमाचा हा रिमेक असणार आहे. या सिनेमाचे नाव इंडियन २ ठेवण्यात येणार आहे. इंडियन २ हा अक्षय कुमारचा दुसरा दाक्षिणात्य सिनेमा असणार आहे. दिग्दर्शक एस. शंकर या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. इंडियन २ सिनेमात मुख्य भूमिकेत कमल हासन दिसणार आहे. यापूर्वी अक्षयने एस. शंकर यांच्या ‘२.०’ या दाक्षिणात्य सिनेमात काम केले होते .अजय देवगनला सिनेमासाठी प्रथम विचारण्यात आले होते. पण काही कारणास्तव अजयने चित्रपटासाठी नकार दिला.‘२.०’सिनेमाच्या वेळी शंकर आणि अक्षय यांच्यात घट्ट मैत्री झाली. त्यानंतर शंकर यांनी अक्षयला ‘इंडियन २’ सिनेमात काम करण्याविषयी विचारलं.

 

याआधी अक्षय कुमारने अनेक सिनेमे केले आहेत. अक्षय कुमार अनेकांना मदतही करत असतो. त्याचप्रमाणे तो उत्तम कराटेपटूसुद्धा आहे. अक्षय कुमारच्या रेड, पॅडमॅन, हॉलीडे या सिनेमांनी चाहत्यांची मने जिंकली. आता अक्षय कुमारची खलनायकाची भूमिका चाहत्यांना आवडते की नाही हे पाहणे मजेशीर असणार आहे.