मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) 9 सप्टेंबरला त्याचा 55 वा वाढदिवस साजरा करणार आहे. याआधी तो संपूर्ण कुटुंबासह लंडनला रवाना झाला आहे. अक्षय महिनाभर परदेशात राहणार असून तेथे कुटुंबासोबत वेळ घालवणार असल्याचं सांगण्यात येत आहे. एकिकडे त्याचे चित्रपट बॅक टू बॅक फ्लॉप झाले असून तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. अशा परिस्थितीत तो काही दिवस चित्रपटांपासून ब्रेक घेणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लेखिका आणि कॉलमनिस्ट ट्विंकल खन्ना मास्टर डिग्री करण्यासाठी जात आहे. ती फिक्शन राइटर आहे. त्यासाठी तिनं लंडन विद्यापीठात अॅडमिशन घेतल आहे. अक्षय त्याच्या पूर्ण कुटुंबासोबत लंडनला रवाना झाला आहे. अक्षय म्हणाला की, लोक त्यांच्या मुलांना कॉलेज सोडयला जातात, पण तो त्याच्या पत्नीला लंडन विद्यापीठात सोडायला जात आहे. कारम तिला फिक्शन राइटिंगमध्ये मास्टर करणार आहे.
ट्विंकलनं वेगवेगळी पुस्तकं लिहिली आहे. यात Mrs Funnybones, Pyjamas are Forgiving आणि The Legend of Lakshmi Prasad हे लोकप्रिय ठरलेली पुस्तक आहेत. अक्षय सद्धा कुटुंबासोबत एक ट्रिप करत असून त्यानं छोटा ब्रेक घेतला आहे. त्यानंतर तो भारतात परतणार आणि ट्विंकल तिथंच कोर्स पूर्ण करणार. त्यामुळे अक्षयच्या चाहत्यांसाठी चिंतेची बाब नाही.
अक्षयच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यानं एकमागे एक चित्रपट दिले. या चित्रपटांमध्ये 'बच्चन पांडे, 'पृथ्वीराज' आणि 'रक्षा बंधन' सारखे चित्रपट आहेत. आता त्याचा 'कठपुतली' हा चित्रपट 2 सप्टेंबर रोजी OTT वर प्रदर्शित होणार आहे. त्याशिवाय 'राम सेतु', 'सेल्फी', Soorarai Pottru चा हिंदी रिमेक, OMG 2 आणि Jolly LLB 3 देखील आहेत.