अक्षय कुमारला पुन्हा महादेवाच्या अवतारात पाहून चाहते खुश म्हणाले, 'हे गाणं ऐकून मला...'

Akshay Kumar singing debut : अभिनयानंतर आता अक्षय कुमारचं संगीत क्षेत्रात पदार्पण... महादेवाच्या रुपात पाहून नेटकरी आनंदात

दिक्षा पाटील | Updated: Feb 5, 2024, 07:18 PM IST
अक्षय कुमारला पुन्हा महादेवाच्या अवतारात पाहून चाहते खुश म्हणाले, 'हे गाणं ऐकून मला...' title=
(Photo Credit : Social Media)

Akshay Kumar singing debut : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. आता आपल्या सगळ्यांच्या लाडक्या खिलाडी कुमारनं अभिनय क्षेत्रानंतर आता संगीत क्षेत्रात पदार्पण केलं आहे. आता त्यानं त्याच्या गाण्यानं त्याच्या चाहत्यांना एक नवं सरप्राइज देण्याचा प्रयत्न करताना अक्षय दिसतोय. अक्षय कुमारचं 'शंभू' हे गाणं प्रदर्शित झालं आहे. अक्षयनं स्वत: हे गाणं गायलं आहे. त्यासोबत तो या व्हिडीओत डान्स करताना देखील दिसला आहे. 

या गाण्यात अक्षय कुमार एका शिवभक्ताच्या रूपात दिसत आहे. त्याचा हा लूक पाहून नुकत्याच रिलीज झालेल्या 'ओह मे गॉड 2' या चित्रपटातील त्याचा लूकची आठवण आल्याशिवाय राहत नाही. 'शंभू' या गाण्याची सुरुवात अक्षयच्या शानदार डान्सने होते. यात अक्षयचा लूक दमदार दिसत आहे. गाण्यात अक्षयचे लांब जटाधारी केस, अंगावर टॅटू, हातात त्रिशूल आणि रुद्राक्ष दिसत आहेत. अक्षय भगवान शिवाच्या भक्तीत पूर्णपणे लिन होऊन नृत्य करताना दिसतोय. दरम्यान, अक्षय आगीशी खेळताना आणि डमरू फिरवताना दिसतो. या गाण्यात अक्षयला सुधीर यदुवंशी आणि विक्रम मॉन्ट्रोज यांनी साथ दिली आहे. शिवाय विक्रम मॉन्ट्रोज हे गाण्याचे संगीतकारही आहेत. या गाण्याची कोरिओग्राफी गणेश आचार्य यांनी केली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अक्षयचं हे गाणं पाहिल्यानंतर नेटकरी , शंभूमधील अक्षय कुमारचा लूक, गायन आणि नृत्य कौशल्याची प्रशंसा करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून. एका नेटकऱ्यानं कमेंट करत म्हटले की, 'अक्षय सर, तुम्ही खूप छान दिसत आहात..' तर दुसरा म्हणतो, 'महादेवाचं हे गाणं ऐकून मला फार आनंद झाला झाला.' तर अजून एका व्यक्तीनं म्हटलं, 'किती शक्तिशाली भक्तीगीत आहे.'

मात्र, अनेकांना माहित नसेल तर अक्षय कुमारनं गाण्याला आवाज देण्याची ही काही पहिलीच वेळ नाही आहे. याआधीही त्यानं आपले गायनकौशल्य दाखवून दिले आहे. 'टशन' चित्रपटातील एका गाण्यात त्यानं आपला आवाज दिला. तर 'स्पेशल 26' मधील 'मुझ में तू' या गाण्याला देखील अक्षयनं आपला आवाज दिला आहे. 

हेही वाचा : ...तर यानंतरच सुरू झाला ऐश्वर्या, जया बच्चन यांचा सासू सुनेचा वाद? अभिषेकही होता नाराज

अक्षय लवकरच 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटात टायगर श्रॉफ सोबत ऍक्शन करताना दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला, जो पाहून अक्षयच्या चाहत्यांची उत्सुकता प्रचंड  वाढलेली दिसत आहे. या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाले असून अली अब्बास जफर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट यावर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. याआधी अक्षयचा 'मिशन रानीगंज' हा चित्रपट रिलीज झाला.