taapsee pannu मुळे अक्षयने गमावले 2 मोठे सिनेमे, कपिल शर्माचा मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या 'रश्मी रॉकेट' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या आठवड्यात 'द कपिल शर्मा शो' मध्ये दिसणार आहे. 

Updated: Oct 14, 2021, 05:47 PM IST
taapsee pannu मुळे अक्षयने गमावले 2 मोठे सिनेमे, कपिल शर्माचा मोठा खुलासा title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू तिच्या 'रश्मी रॉकेट' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या आठवड्यात 'द कपिल शर्मा शो' मध्ये दिसणार आहे. तापसीचा हा चित्रपट 15 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. शो दरम्यान, कपिल अक्षय कुमारचे नाव घेत तापसी पन्नूला त्याच्या स्वतःच्या अंदाजात टोमणे मारताना दिसेल. तापसीसोबत विनोद करताना, कपिल सांगेल की अभिनेत्रीने अक्षय कुमारला तिच्या दोन चित्रपटांमधून कसा बाहेरचा रस्ता दाखवला.

वाहिनीने 'द कपिल शर्मा शो' चा प्रोमो शेअर केला आहे, जो खूप व्हायरल होत आहे. प्रोमोमध्ये कपिल म्हणतो की तापसीने प्रथम अक्षय कुमारसोबत 'बेबी' हा चित्रपट केला आणि चित्रपटात 'शबाना' नावाचे पात्र साकारले.

यानंतर त्याने 'नाम शबाना' हा संपूर्ण चित्रपट केला आणि अक्षय कुमारला या चित्रपटातून वगळले. त्यानंतर तिने अक्षयसोबत 'मिशन मंगल' हा सिनेमा केला, ज्यामध्ये तिने रॉकेट बनवले, पण स्वतः 'रश्मी रॉकेट' हा सिनेमा जेव्हा बनवला तेव्हा अक्षय कुमारला या सिनेमातून बाहेर केले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कपिलचं बोलणं ऐकून तापसीला तिचं हसू आवरलं नाही. अभिनेत्री म्हणाली की मी तुला बाहेर काढणार नाही. यावर कपिल अर्चना पूरन सिंह यांच्याकडे बोट दाखवत म्हणाला, की मी अर्चना यांच्याबद्दल बोलत आहे. कपिल आणि तापसीची जुगलबंदी पाहिल्यानंतर अर्चना पूरन सिंह मोठ्याने हसायला लागल्या.