Aryan Khan च्या अटकेनंतर अक्षय कुमार अद्याप शांत, कारण...

बॉलिवूडमध्ये अनेक सेलेब्स एखाद्या प्रकरणावर ट्विट किंवा पोस्टद्वारे आपलं मत मांडताना दिसतात. 

Updated: Oct 14, 2021, 05:16 PM IST
Aryan Khan च्या अटकेनंतर अक्षय कुमार अद्याप शांत, कारण... title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक सेलेब्स एखाद्या प्रकरणावर ट्विट किंवा पोस्टद्वारे आपलं मत मांडताना दिसतात. सध्या शाहरुख खानचा मुलगा आर्य़न खान ड्रग्स प्रकरणात अडकला आहे. त्याची NCB कडून चौकशी सुरु आहे. यावेळी शाहरुखसोबत त्याचे फॅन्स उभे आहेत. एवढंच नाही, तर अनेक मोठ्या स्टार्सने शाहरुखला सपोर्ट दाखवला आहे. आर्य़न खानच्या बाजूने असल्याचं ते पोस्टद्वारे सांगत आहेत.

अभिनेता सलमान खान आर्य़न खानच्या अटकेनंतर रात्री उशिरा शाहरुख खानला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचला होता. पण बऱ्याचदा आपलं मत ठाम पणे मांडणारा अक्षय कुमार या प्रकरणात काहीही बोलताना दिसला नाही. त्याने कोणत्याही प्रकारची पोस्ट किंवा प्रतिक्रिया अद्याप शेअर केलेली नाही.

अक्षय कुमार आणि शाहरुख खान हे दोघे चांगले मित्र आहेत. अक्षय सोबतच अजय देवगण, शाहरुखची जवळची मैत्रिण काजोल यांनी देखील शांत राहणचं पसंत केलं आहे.

काही सेलिब्रिटी या प्रकरणात खुले पणाने बोलताना दिसत आहेत. तर काही स्टार्स अद्याप गप्प आहे. , आर्यन खानच्या अडचणी थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. त्याची पुढील सुनावणी आता 20 तारखेला होणार आहे. तो पर्यंत त्याला NCB च्या कोठडीत राहवं लागणार आहे.

आर्य़नच्या अटकेनंतर अक्षयने आपल्या मुलाला ही वॉर्न केल्याचं बोललं जात होतं. कारण आर्यनच्या अटकेनंतर अक्षयचा मुलगा आरव कूमार देखील चर्चेत आला होता.