Koffee with karan S7: सतत चर्चेत असलेला शो म्हणजे कॉफी विथ करन. त्यातून आता तर या शोची भलतीच चर्चा आहे कारण लग्न, डेटिंग, सेक्स, बॉयफ्रेंड, कीस अशा विषयांना येथे चांगलेच मिर्च मसाला लावून सांगितले जाते त्यामुळे सतत हा शो वादाच्या भोवऱ्यात असतो. त्यातून या शोला सतत भयंकर प्रकारे ट्रोलही केले जाते. करण जोेहरचा हा शो फारच जास्त कॉट्रोव्हर्शील असून आता या शोचा सातवा सिझनही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
नुकतेच या शोमधून अक्षय कुमार आणि समांथा प्रभू यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे एका जोडीला काहीसा भलताच भाव चढलेला दिसतो आहे. एकतर या नव्या शोमध्ये अक्षय कुमार आणि समांथा हे कॉम्बिनेशन पहिल्यांदाच पाहायला मिळाले आहे. लोकांची अशी अपेक्षा होती की कदाचित अक्षयसोबत परत त्याची बायकोच दिसेल किंवा नाहीतर समांथासोबत अल्लू अर्जून दिसेल पण असे न होता या शोमध्ये समांथा आणि अक्षय दिसले.
या शोमध्ये करणने अक्षयला प्रश्न विचारून पुरते भांडावून सोडले. करणने त्याला विचारले. कतरिना आणि विकीला तूला लग्नाचा कोणता सल्ला द्यायला आवडेल... तेव्हा त्याने त्या सल्ल्याबद्दल सांगितले की, "मी तिला चांगले ओळखतो म्हणून, कतरिना... विकीचे कान खाऊ नकोस..फक्त हळुहळू ते कुरतडून टाक" (I know her very well, so, Katrina...don't eat his ears off..just slowly nibble it) आणि विकीसाठी त्याने सल्ला दिला की, "तू तिला तूझ्या घरचे जीमचं बनवं म्हणजे ती घरी बसेल. तिला घरी जास्त वेळ पाहायचे असेल तर तिला हे करायला लाव.'' (Make her a home gym and you will see her more at home)
विकी आणि कतरिनाने 9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानमध्ये लग्न केले. 'कॉफी विथ करण 7' च्या तिसर्या भागात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने बॉलीवूड रणबीर कपूर-आलिया भट्ट आणि विकी कौशल-कतरिना कैफ या नवविवाहित जोडप्यांना विशेष विवाह सल्ला दिला.
अक्षयने 17 जानेवारी 2001 रोजी अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्नासोबत लग्न केले. ते दोन मुले मुलगा आरव आणि मुलगी नितारा यांचे पालक आहेत. अक्षय लवकरच नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.