अक्षय कुमारने दिलं परिणीती चोप्राला लग्नाचं खास गिफ्ट; पाहून तुम्हालाही बसेल धक्का

अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा यांनी यापूर्वी 'केसरी'मध्ये एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. आता लवकरच अक्षय आणि परिणीतीचा चित्रपट प्रदर्शित होत आहे. यापूर्वी अक्षयने आपल्या सह-अभिनेत्रीला तिच्या लग्नाच्या निमित्ताने एक सुंदर भेट दिली आहे.

Updated: Oct 4, 2023, 08:26 PM IST
अक्षय कुमारने दिलं परिणीती चोप्राला लग्नाचं खास गिफ्ट; पाहून तुम्हालाही बसेल धक्का title=

मुंबई : परिणीती चोप्राने 27 सप्टेंबरला खासदार आणि कॉलेज मित्र राघव चढ्ढासोबत लग्न केलं. हे लग्न राजस्थानमधील उदयपूर येथील एका सुंदर ठिकाणी पार पडलं. लग्नानंतर परिणीती तिच्या सोशल मीडियावर सतत तिच्या लग्नाचे बीटीएस फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. त्याचबरोबर तिचा लग्नानंतरचा पहिला चित्रपट 'मिशन राणीगंज : द ग्रेट रेस्क्यू ऑफ इंडिया' रिलीज होणार आहे. हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असून त्याच्यासोबत परिणीती चोप्रा दिसणार आहे. अक्षय आणि परिणीतीचा हा दुसरा चित्रपट आहे.

अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा यांनी यापूर्वी 'केसरी'मध्ये एकत्र काम केलं होतं. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. आता लवकरच अक्षय आणि परिणीतीचा चित्रपट प्रदर्शित होत आहे. यापूर्वी अक्षयने आपल्या सह-अभिनेत्रीला तिच्या लग्नाच्या निमित्ताने एक सुंदर भेट दिली आहे. यामुळे परिणीती नक्कीच खूप खूश होणार आहे.

एक दिवसापूर्वी अक्षय कुमारने आगामी 'मिशन रानीगंज' या चित्रपटातील नवीन गाण्याची झलक शेअर केली होती. यामध्ये अक्षय आणि परिणीती रोमँटिक स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहेत. या गाण्यात एक रोमँटिक अँगल होता. हा फोटो शेअर करताना अक्षय म्हणाला की, ही परिणीतीच्या लग्नाची भेट आहे.

अक्षय कुमारने पोस्ट शेअर करत लिहिलं की, ''प्रेमापेक्षा मोठं काहीही नाही, परिणीती चोप्रा. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या खास दिवसांसाठी ही भेट आहे! भारताच्या खऱ्या हिरोची कथा, मिशन रानीगंज. 6 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात पहा. खरंतर हा फोटो चित्रपटातील 'कीमत' या रोमँटिक गाण्याची झलक आहे. या फोटोसोबत त्याने काही ईमोजी देखील शेअर केल्या आहेत. 

त्याचबरोबर या चित्रपटाचं दुसरं गाणं 'किमत' आहे, जे काहीच वेळापूर्वी लाँच झालं आहे. गाण्यात अक्षय आणि परिणीती यांच्यात रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळतेय. परिणीती चोप्राचा साधेपणा चाहत्यांची मने जिंकत आहे.