खिलाडी कुमार 'या' निर्णयावर का पोहोचला, त्याला कशाची कमतरता?

काय कमी होतं.... पैसे कमवण्यासाठी अक्षय कुमारचा इतका मोठा निर्णय?  

Updated: Jul 29, 2022, 11:58 AM IST
खिलाडी कुमार 'या' निर्णयावर का पोहोचला, त्याला कशाची कमतरता? title=

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार सध्या आगामी 'रक्षाबंधन' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशन दरम्यान अभिनेता खासगी आयुष्याबद्दल वक्तव्य करताना दिसत आहे. शुन्यापासून करिअरची सुरूवात केलेला अक्षय आज यशाच्या उच्च शिखरावर पोहोचला आहे. अभिनेत्याने क्षेत्रातील कोणत्याही कमाला कमी लेखलं नाही. आज कुटुंबासोबत रॉयल आयुष्य जगणारा अक्षय कधीही कोणत्याही कामाला नकार देत नाही. सिनेमे, जाहिरात, कार्यक्रम.... या माध्यमातून अक्षय बक्कळ पैसे कमावतो. 

अक्षय म्हणाला, लोक मला विचारतात की मी एका वर्षात इतके चित्रपट का करतो? मला आयुष्यात तीन गोष्टी समजल्या आहेत - काम, कमाई आणि कर्म. मी खूप मेहनत करतो. जमेल तितकं कमवायचा प्रयत्न करतो. मी कोणतेही काम नाकारत नाही.

पुढे अभिनेता म्हणाला, 'भूमिका कोणतीही असो, कोणतेही कार्य असो, तुम्हाला त्यातून पैसे मिळतात. म्हणून मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तुम्ही जितके काम कराल तितके पैसे कमवाल. तुम्ही तेच समाजाला परत कराल आणि त्यात काही गैर आहे.. असे मला वाटत नाही.  असं देखील अक्षय म्हणाला. 

दरम्यान, 'रक्षा बंधन'मध्ये अक्षय कुमार भूमी पेडणेकरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. सिनेमा 11 ऑगस्ट रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले आहे.

सिनेमाची निर्मिती कलर येलो प्रॉडक्शन, झी स्टुडिओ, केप ऑफ गुड फिल्म्ससह अलका हिरानंदानी यांनी केली आहे. याशिवाय अक्षय 'सेल्फी' सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमा 24 फेब्रुवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.