मुंबई : देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याला (Citizenship Amendment Act) विरोध होत आहे. देशातील महत्वाच्या विद्यापाठीपैकी एक असलेल्या जामिया मिल्लिया इस्लामियाच्या (Jamia Millia Islamia) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सरकारचा कडाडून विरोध होताना पाहायला मिळत आहे. या प्रकरणावर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने ट्विट (Akshay Kumar Tweet) केलं आहे.
अक्षय कुमारचं हे ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अक्षयने या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की,'माझ्याकडून चुकून जामियाच्या विद्यार्थ्यांचे ट्विट लाईक झाले. ट्विट पाहताना खाली स्क्रॉल करताना चुकून ते लाईक झाले. हे कळताच मी ते अनलाईक केले आहे.' अक्षयने या ट्विटीमधून सारवासारव केली आहे.
Regarding the ‘like’ on the tweet of Jamia Milia students, it was by mistake. I was scrolling and accidentally it must have been pressed and when I realised I immediately unliked it as In no way do I support such acts.
— Akshay Kumar (@akshaykumar) December 16, 2019
अक्षय ट्वीटमध्ये म्हणतो की,'माझ्याकडून हे ट्वीट नजरचुकीने लाईक झालं. मी अशा आंदोलनाचे समर्थन करत नाही.' अक्षयचे काही मिनिटांपूर्वीच हे ट्विट करून माहिती दिली आहे.
या आंदोलनावर अभिनेता फरहान अख्तरने देखील ट्विट केलं आहे. एका युझर्सने फरहान अख्तरला टॅग करून ट्विट केलं आहे की,'आपल्या समजापर्यंत ही गोष्ट पोहोचवा की, माझ्या देशाच्या संपत्तीची नासाडी करू नका. यानंतर त्यांना अटक होऊन मारण्यात आलं. तर रडू नका.'
Going to request David Dhawan to cast you in ‘Bigot no 1.’ .. you are perfect for the part. https://t.co/mJY06imbA4
— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) December 15, 2019
हे ट्विय युझर्सने फरहान अख्तरला आणि शबाना आझमी यांना टॅग केलं आहे. यावर उत्तर देत फरहान अख्तर म्हणाला की,'मी डेविड धवन यांना रिक्वेस्ट करतो की, ते तुम्हाला Bigot No1 म्हणजे कट्टर नंबर वन म्हणून कास्ट करतील. तुम्ही या रोलसाठी परफेक्ट आहात.' फरहान अख्तरने हिंसा टाळण्यासाठी अपील न करता असं ट्वीट केलं आहे.