एका चित्रपटासाठी अक्षय कुमार घेतो 100 कोटी; संपत्ती ऐकून तुम्हाला धक्का बसेल!

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार सध्या त्याच्या 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Updated: Jun 4, 2022, 04:17 PM IST
एका चित्रपटासाठी अक्षय कुमार घेतो 100 कोटी;  संपत्ती ऐकून तुम्हाला धक्का बसेल! title=

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार सध्या त्याच्या 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात सम्राट पृथ्वीराजची दमदार भूमिका साकारून अक्षय चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. अक्षय सध्याच्या काळातील सर्वात यशस्वी स्टार्सपैकी एक आहे. त्याची ब्रँड व्हॅल्यू 140 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 1066 कोटी रुपये आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय प्रत्येक जाहिरातीसाठी 6-7 कोटी रुपये घेतो. दरवर्षी 4-5 चित्रपटांमध्ये काम करणारा अक्षय कुमार हा इंडस्ट्रीत सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे. तो प्रत्येक चित्रपटासाठी सुमारे 100 कोटी रुपये घेतो. तर अक्षयने नफा वाटणीवर साइन केलेले अनेक चित्रपट आहेत.

चित्रपट आणि जाहिरातींव्यतिरिक्त अक्षय प्रॉडक्शन कंपनी हरी ओम आणि ग्रेझिंग गोट पिक्चर्समधूनही मोठी कमाई करतो. अक्षय वर्ल्ड कबड्डी लीग संघ खालसा वॉरियर्सचा मालक आहे. त्याने 300 कोटींची वैयक्तिक गुंतवणूक केली आहे. 100 हून अधिक चित्रपटांमध्ये दिसलेल्या अक्षयची एकूण संपत्ती 2050 कोटी रुपये आहे. तर अभिनेत्याकडे 11 लक्झरी कार आणि बाईक देखील आहेत.

कोरोनाच्या काळात अक्षय पीएम केअर फंडला २५ कोटी देणगी देऊन चर्चेत आला होता. त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर, तो सेल्फी या चित्रपटासह इतर काही मोठ्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अक्षयने अतरंगी रे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विशेष यश मिळवले नाही.