Akash Thosar Wedding : 'सैराट' (Sairat) फेम अभिनेता आकाश ठोसर (Akash Thosar) हा लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. या चित्रपटातून आकाशनं फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारतातील जनतेच्या मनात स्वत: चं स्थान मिळवलं. आकाश हा त्याचा आगामी चित्रपट 'घर, बंदूक, बिरयानी' घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आकाशचे चाहते त्याच्या या आगामी चित्रपटाच्या प्रतिक्षेत आतुर झाले आहेत. एकीकडे चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या आकाशनं त्याच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. आकाशनं त्याच्या लग्नाची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. पण हे खरं आहे का? त्यानं शेअर केलेल्या पोस्टवरून तरी अशाच चर्चा सुरू आहेत.
आकाशनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये मुंडावळ्या बांधून नवरदेवाच्या कपड्यांमध्ये आकाश असल्याचे पाहायला मिळत आहे. हे फोटो शेअर करत आकाशनं कॅप्शन दिलं की 'जमलय बर का…….. यायला लागतय!!! 10 दिवस बाकी'. त्यामुळे खरंच आकाशचं लग्न ठरलं का? अशा चर्चांना उधाण आलं आहे. आकाशची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली असून त्याच्या लग्नाच्या चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत.
इतकंच काय तर आकाशनं शेअर केलेल्या फोटोवर कमेंट करत अनेक नेटकऱ्यांनी त्याच्या लग्नाविषयी प्रश्न केले आहेत. एक नेटकरी म्हणाला, नक्की येऊ भाऊ. दुसरा नेटकरी म्हणाला, 'नवरीच नाव काय आहे?' तिसरा नेटकरी म्हणाला, 'मी रेडी आहे. येऊ का मग.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'मुळ पत्रिका पाहिजे आम्हाला.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'येतोय लग्नाला पण तुझ्या होणाऱ्या बायकोचं नाव काय आहे?' असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांनी आकाशला केले आहेत.
हेही वाचा : धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्री Akanksha Dubey ने स्वतःला संपवलं, हॉटेलमध्ये आढळला मृतदेह
दरम्यान, आकाशची ही पोस्ट त्याच्या लग्नासाठी नाही तर त्याचा आगामी चित्रपट घर, बंदूक, बिरयानी यासाठी आहे. त्याचा हा आगामी चित्रपट 7 एप्रिल रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्श नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी केले आहे. तर चित्रपटात आकाशसोबत सयाजी शिंदे (Sayaji Shinde), नागराज मंजुळे आणि सायली पाटील (Sayali Patil) यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.