स्वत:ला संपवण्याआधी केलेल्या इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये Akanksha Dubey सतत रडत होती, व्हिडीओ तुफान व्हायरल

Akanksha Dubey Last Post and Instagram Live : आकांक्षा दुबेनं इतका मोठा निर्णय का घेतला ही माहिती अजून समोर आलेली नाही. पण स्वत: ला संपवण्याआधी आकांक्षानं डान्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. तर एका नेटकऱ्याच्या म्हणण्यानुसार स्वत: ला संपवण्याआधी आकांक्षा लाइव्ह करत चाहत्यांच्या संपर्कात आली तेव्हा ती रडत होती. सध्या हे दोन्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Updated: Mar 26, 2023, 05:48 PM IST
स्वत:ला संपवण्याआधी केलेल्या इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये Akanksha Dubey सतत रडत होती, व्हिडीओ तुफान व्हायरल title=

Akanksha Dubey Last Post and Instagram Live Video Before Ending Her Life : भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेनं (Akanksha Dubey) आज 26 मार्च 2023 रोजी आकांक्षानं आत्महत्या केली आहे. बनारसमध्ये एका हॉटेल रुममध्ये आकांक्षानं आत्महत्या केली आहे. हे हॉटेलमध्ये सारनाथ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पोलिस चौकशी सुरु आहे. आकांशा फक्त 25 वर्षांची असून तिनं असं का केलं असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. आकांक्षानं आत्महत्या करण्याआधी सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यासोबत काही तासांपूर्वी ती लाइव्ह सुद्धा आली होती. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Akanksha Dubey Last Video)

आकांक्षानं आत्महत्या करण्याच्या काही तासांपूर्वी इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत आकांक्षानं काळ्या रंगाचं टॉप परिधान केलं आहे. तर व्हिडीओत आकांक्षा एका भोजपुरी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओत आकांक्षा आनंदी असल्याचे दिसत आहे. मिररसमोर डान्स करत असून तिच रेकॉर्ड देखील करत आहे. हा व्हिडीओ आकांक्षानं आत्महत्या करण्याच्या काही तासांपूर्वीच हा व्हिडीओ शेअर केला होता. (Akanksha Dubey Instagram Live) 

आकांक्षाची अखेरची पोस्ट -

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, आकांक्षाचा आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडीओत आकांक्षा रडताना दिसत आहे. तर सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करणाऱ्या एका व्यक्तीनं म्हटलं आहे की आत्महत्या करण्याच्या काही तासांपूर्वी आकांक्षा ही इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लाइव्ह आली होती. इन्स्टाग्राम लाइव्ह सुरु असताना आकांक्षा रडत होती. त्यावेळी त्यानं लगेच स्क्रिन रेकॉर्ड केला असं त्या नेटकऱ्यांनी व्हिडीओ शेअर करत सांगितले आहे. आकांक्षाचे इन्स्टाग्राम अकाऊंटवरन 1.7 मिलियन फॉलोवर्स आहेत. (Akanksha Dubey Instagram Followers)

नुकताच आकांक्षाचा भोजपुरी सुपरस्टार पवन सिंगसोबत एक नवीन गाणं प्रदर्शित झालं होतं. त्या गाण्याचं नाव 'आरा कभी हारा नहीं' असं आहे. या सगळ्यात आकांक्षाच्या आत्महत्येच्या बातमीनं भोजपुरी चित्रपटसृष्टीसोबतच तिच्या चाहत्यांना मोठा धक्काबसला आहे. आकांक्षाच्या आत्महत्या करण्याचे कारण अजून समोर आलेले नाही. तर पोलिस त्या प्रकरणी चौकशी करत आहेत. (Akanksha Dubey Viral Video)