अजय देवगणच्या 'तान्हाजी'ची कमाल, १०० कोटींच्या घरात कमाई!

 २०२० या नवीन वर्षात पहिल्या महिन्यात १०० कोटी रुपयांच्या घरात पोहोचणार अभिनेता अजय देवगणचा 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर'  हा सिनेमा ठरणार आहे. 

Updated: Jan 15, 2020, 07:00 PM IST
अजय देवगणच्या 'तान्हाजी'ची कमाल, १०० कोटींच्या घरात कमाई! title=
Image Courtesy: Twitter/@/taran_adarsh

मुंबई : २०२० या नवीन वर्षात पहिल्या महिन्यात १०० कोटी रुपयांच्या घरात पोहोचणार अभिनेता अजय देवगणचा 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर'  हा सिनेमा ठरणार आहे. या सिनेमाच्या कमाईचा आकडा दिवसागणिक वाढतच आहे. आतापर्यंत ९० कोटी रुपयांच्या घरात कमाई केली असून तो याच आढवठ्यात १०० कोटींच्या घरात कमाईचा आकडा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणारा 'तान्हाजी' पहिलाच सिनेमा ठरणार आहे.

अजय देवगणची या सिनेमात मुख्य भूमिका आहे. 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' या सिनेमाने सध्या बॉक्स ऑफिसवर अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. रविवारी या चित्रपटाने २६.०८ कोटींचा गल्ला जमवला ज्यामुळे आता या चित्रपटाच्या कमाईचे आकडे ९० कोटी रुपयांवर पोहोचले आहेत. शुक्रवारी पहिल्या दिवशी १६ कोटी, दुसऱ्या दिवशी २० कोटी, शनिवारी २५.५० कोटी, सोमवारी १३.५० कोटी, मंगळवारी १५.२५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. हा सिनेमा दोन दिवसात १०० कोटींचा आकडा पार करेल अशी शक्यता आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून या चित्रपटाच्या कमाईचे आकडे सर्वांसमोर आणले. ओम राऊत दिग्दर्शित Tanhaji The Unsung Warrior या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या एका असामान्य मोहिमेवर प्रकाशझोत टाकण्यात आला. ज्यामध्ये तान्हाजी मालुसरे यांचे कार्य भव्य रुपात प्रेक्षकांपर्यंत पोहोचले.