अजय देवगणच्या मुलाचीही #HumFittoIndiaFit चॅलेन्जमध्ये उडी !

क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी काही दिवसांपूर्वी इंटरनेटवर फीटनेस चॅलेन्ज सुरू केले आहे. 

Updated: May 28, 2018, 06:58 PM IST
अजय देवगणच्या मुलाचीही #HumFittoIndiaFit चॅलेन्जमध्ये उडी ! title=

मुंबई : क्रीडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी काही दिवसांपूर्वी इंटरनेटवर फीटनेस चॅलेन्ज सुरू केले आहे. 'ह्म फीट तो इंडिया फीट' या संकल्पनेखाली या फीटनेस चॅलेन्जमध्ये आवडीचा व्यायाम प्रकार व्हिडिओ स्वरूपात शेअर केला जात आहे.  बॉलिवूडच्या कलाकारांपासून थेट राजकारणी आणि खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेतला आहे. इंटरनेटवर अनेक सेलिब्रिटींची व्हिडिओ शेअर होत असताना एका खास व्हिडिओने नेटकर्‍यांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

युग देवगणने वेधले लक्ष  

काजोल आणि अजय देवगणचा चिमुकला युगदेखील फीटनेस फ्रीक आहे. अवघ्या 7 वर्षांच्या युगचा फीटनेस पाहून तुम्ही आवाक व्हाल नक्की ! अजय देवगण आणि काजोलनेही हा व्हिडिओ शेअर केला आहे.  यामध्ये युग जिममध्ये त्याच्या खास अंदाजात व्यायाम करताना दिसत आहे. पुशअप्स, पुलअप्स करताना युगचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये अजय सोबतच काजोलनेही शेअर केला आहे. युग कमालीचा फ्लेक्सिबलदेखील आहे. 

 

 

 काय आहे चॅलेन्ज? 

 राज्यवर्धन राठोड यांनी सुरू केलेल्या या फीटनेस चॅलेन्जमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, ऋतिक रोशन, सायना नेहवाल यांचा सहभाग आहे. विराटने या चॅलेन्जला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनुष्का शर्मा, एमएस धोनीकडे यांना दिले आहे.