अजय देवगणच्या 'त्या' कृत्यामुळे संतापली होती काजोल, अभिनेत्याला मागावी लागली होती माफी

Ajay Devgn Kiss : अजय देवगणच्या ‘शिवाय’ या चित्रपटात त्याचा एक किसिंग सीन होता. त्याविषयी काजोलला कोणतीही माहिती नव्हती त्यामुळे तिला राग आल्याचे तिनं सांगितलं. त्यानंतर अजयनं कशी तिची समजूत काढली याविषयी सांगितली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jul 27, 2023, 07:35 PM IST
अजय देवगणच्या 'त्या' कृत्यामुळे संतापली होती काजोल, अभिनेत्याला मागावी लागली होती माफी title=
(Photo Credit : Social Media)

Ajay Devgn Kiss : बॉलिवूड अभिनेत्री काजोल आणि तिचा पती अजय देवगण हे यांची जोडी ही लोकप्रिय कपल्सपैकी एक आहे. काजोल सध्या तिच्या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. कारण तिनं 'द ट्रायल' या तिच्या वेब सीरिजमध्ये तिनं तिची नो किसिंग पॉलिसी मोडीत घातली असून दोन अभिनेत्यांना किस केलं आहे. त्यात ज्यावेळी काजोलचे हे किसिंग सीन शूट करण्यात आले त्यावेळी अजय देवगण तिथे उपस्थित नव्हता. पण या किसिंग सीनविषयी अजयला आधीच ठावूक होते. दरम्यान, एकदा असं झालं होतं की अजयनं एक किसिंग सीन शूट केला होता आणि त्या किसिंग सीनविषयी काजोलला काही माहिती नव्हती. ज्यावेळी काजोलला तिच्या या सीनविषयी कळलं तेव्हा तिची काय प्रतिक्रिया होती हे जाणून घेऊया.

खरंतर हा किस्सा अजयच्या ‘शिवाय’ या चित्रपटातील आहे. या चित्रपटात अजय देवगण महत्त्वाच्या भूमिकेत होता. इतकंच नाही तर त्याचा एक किसिंग सीन देखील होता. या चित्रपटा आधी अजयनं जितके चित्रपट केले त्या सगळ्यांमध्ये नो किसिंग पॉलिसी होती. त्यानं या चित्रपटात जेव्हा किसिंग सीन दिला तेव्हा सगळ्यांना आश्चर्य झाले होते. इतकंच काय तर अजयच्या या किसिंग सीनबद्दल काजोलला माहित नव्हत. जेव्हा काजोलला याविषयी कळलं तेव्हा तिला प्रचंड राग आला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अजयनं चित्रपटातील किसिंग सीनविषयी काजोलला काही कल्पना दिली नव्हती. त्यामुळे तिला प्रचंड राग आला होता. काजोलनं याविषयी द कपिल शर्मा शोमध्ये हा संपूर्ण किस्सा सांगितला होता. काजोलला कपिलनं विचारलं होतं की 'अजयला ऑनस्क्रीन किस करताना पाहिल्यावर तुझी कशी प्रतिक्रिया होती?' असं विचारल्यानंतर काजोल म्हणाली, 'मी त्या चित्रपटाची निर्माती होते, तरीही मला या चित्रपटातील अजयच्या किसिंग सीनबद्दल सांगण्यात आलं नाही. त्यानंतर अजयने यासाठी माझी माफी मागितली. अजयनं माफी मागितल्यानंतर मी त्याला माफ केले,' असं काजोल यावेळी म्हणाली. 

हेही वाचा : पहिल्याच दिवशी करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' इतक्या कोटींची कमाई करणार!

काजोलच्या कामाविषयी बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वी काजोल 'लस्ट स्टोरीज 2' या चित्रपटात दिसली होती. तर त्यानंतर ती द ट्रायल या वेब सीरिजमध्ये दिसली. काजोलनं या दोन्ही प्रोजेक्ट्स मध्ये केलेल्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली आहेत. तर अजय देवगणच्या कामाविषयी बोलायचं झालं तर तो भोला या चित्रपटात दिसला होता. आता अजय हा मैदान या चित्रपटात दिसणार आहे.