दृश्यमधील अनु झाली एवढी मोठी, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

 2015 मध्ये आलेला 'दृश्यम' हा चित्रपट लोकांना खूप आवडला होता

Updated: Jan 24, 2022, 09:16 PM IST
दृश्यमधील अनु झाली एवढी मोठी, सोशल मीडियावर फोटो व्हायरल title=

मुंबई : 2015 मध्ये आलेला 'दृश्यम' हा चित्रपट लोकांना खूप आवडला होता. या थ्रिलर चित्रपटावर लोकांनी खूप प्रेम केलं. या चित्रपटाने अनेक पुरस्कारही आपल्या नावावर केले. या चित्रपटात अजय देवगण, श्रिया सरन आणि तब्बू मुख्य भूमिकेत दिसले होते. चित्रपटातील स्टार्सच्या अभिनयासोबतच अजय देवगण आणि श्रिया सरन यांच्या मुलांचा अभिनयही लोकांना आवडला. विशेषत: या चित्रपटात अजय देवगणची धाकटी मुलगी 'अनु' उर्फ ​​मृणाल जाधवने तिच्या उत्कृष्ट अभिनयाने खूप चर्चा निर्माण केली होती. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की चित्रपटातील धाकटी अनु आता मोठी झाली आहे.

मृणालचा लुकही खूप बदलला आहे. मृणाल जाधवचा एक  फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. जो लोकांना खूप आवडतोय. मृणालचा हा फोटो पाहिल्यानंतर तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही  की, दृश्यम चित्रपटात अजय देवगणची सर्वात लहान मुलगी बनलेली अनु आता इतकी मोठी आणि सुंदर झाली आहे. समोर आलेल्या मृणालच्या ताज्या फोटोमध्ये तुम्ही ती माईकवर काहीतरी बोलताना दिसत आहे. तिचा हा फोटो तिच्या एका मुलाखतीदरम्यानचा आहे.

मृणाल जाधवने 'दृश्यम' चित्रपटात आपल्या दमदार भूमिकेने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. इतक्या लहान वयात इतका जबरदस्त अभिनय पाहिल्यानंतर लोकं तिचं कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकले नव्हते. मृणालचा हा लेटेस्ट लूक  सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.