अय्यारी चित्रपटाच्या टीमने जवानांसोबत साजरा केला प्रजासत्ताक दिन...

प्रदर्शनापूर्वी अय्यारी चित्रपटाच्या कलाकारांनी आणि इतर सदस्यांनी सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 27, 2018, 06:49 PM IST
अय्यारी चित्रपटाच्या टीमने जवानांसोबत साजरा केला प्रजासत्ताक दिन... title=

नवी दिल्ली : प्रदर्शनापूर्वी 'अय्यारी' चित्रपटाच्या कलाकारांनी आणि इतर सदस्यांनी सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली. त्याचबरोबर त्यांनी वाघा बॉर्डरवर आपल्या सैनिकांसोबत प्रजासत्ताक दिन साजरा केला. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज पांडे आणि शितल भाटीयांसोबतच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, मनोज वाजपेयी, रकुल प्रीत सिंग आणि पूजा चोप्रा हे कलाकार उपस्थित होते.

 

#Repost @rakulpreet  What a lovely mornjng !! #Golden temple with team @aiyaary .. #blessings #wahegurujikakhalsa waheguru ji di fateh!! @s1dofficial @neerajpofficial

A post shared by Aiyaary (@aiyaary) on

अय्यारी हा चित्रपट ९ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. 

यापूर्वी अय्यारी टीमने जेसलमेलमध्ये बीएसएफ शिबीराचा दौरा केला होता. तिथे त्यांनी तीन दिवस सैनिकांसोबत घालवले. त्यांची दिनचर्या समजून घेण्याचा प्रयत्न केला.

जवानांच्या जीवनावर अय्यारी हा चित्रपट आधारित आहे. यात सिद्धार्थ मल्होत्रा आणि मनोज बाजपेयी गुरू-शिष्याच्या भूमिकेत दिसतील.