ऐश्वर्याने लाईव्ह मुलाखतीत अभिषेक बच्चनला सांगितलं Kiss Me, आणि पुढे...

ऐश्वर्यावर अशी वेळ का आली जेव्हा तिने सर्वांसमोर अभिषेकला किस करण्यास सांगितलं

Updated: Nov 12, 2021, 10:17 AM IST
ऐश्वर्याने लाईव्ह मुलाखतीत अभिषेक बच्चनला सांगितलं Kiss Me, आणि पुढे... title=

मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन लग्नानंतर चित्रपटांमध्ये कमी दिसली असेल, पण एक काळ असा होता जेव्हा तिने लोकांशी संवाद साधण्याची एकही संधी सोडली नाही. 2009 मध्ये लग्नानंतर तिला अभिषेक बच्चनसोबत ओप्रा विन्फ्रेच्या शोमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यानंतर जगभरातील सर्व लोकांनी तिच्या सौंदर्याकडे लक्ष दिले. शोमध्ये ऐश्वर्याने आपल्या रिस्पॉन्सने सर्वांची मने जिंकली.

Oprah Winfrey चा शो खूप प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये जगभरातील लोकांना यायला आवडतात. जेव्हा ऐश्वर्या आणि अभिषेक या खास शोमध्ये सामील झाले तेव्हा ओप्राने त्यांना त्यांच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित सर्व प्रश्न विचारले. नातेसंबंध आणि चित्रपटांशी संबंधित सर्व प्रश्नांची ऐश्वर्याने अतिशय सुंदर उत्तरे दिली. 

मुलाखतीदरम्यान असाही टप्पा आला, जेव्हा ऐश्वर्याला विचारलेल्या प्रश्नावर सर्वांच्याचं भुवया उंचावल्या. ऐश्वर्याला ओप्राने विचारले की, कारकीर्द चांगली असताना कधीही कॅमेरासमोर किसिंग सीन का दिला नाही?

ओप्राने विचारले होते, 'तू कधी कॅमेऱ्यासमोर किसिंग सीन दिले नसल्यासारखे वाटते.' या प्रश्नावर ऐश्वर्याने आधी स्मितहास्य केले, नंतर अभिषेककडे वळून म्हणाली- 'आगे बढो बेबी.' अभिषेकला लगेच पत्नीचे हावभाव समजले. त्यानंतर अभिषेकने कॅमेऱ्यासमोर ऐश्वर्याला गालावर किस केले. त्यानंतर ओप्राने असा प्रश्न विचारला, ज्याचे उत्तर सर्वांना जाणून घ्यायला आवडेल. 

तिने विचारले की, पाश्चात्य चित्रपटांमध्ये जोडप्यांना किस घेणे आणि प्रेमात पडणे हे खूप सामान्य आहे, परंतु भारतात असे होत नाही. असे का? अभिषेकने उत्तर दिले की, 'आम्हाला त्याची गरज वाटत नाही. जेव्हा मुलगा एखाद्या दृश्यात मुलींना भेटतो तेव्हा ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. ते प्रेम व्यक्त करण्यासाठी ते किस करतात, पण भारतात ते व्यक्त करण्यासाठी असं करावं लागत नाही.